जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व कम्प्युटर साठी निधी उपलब्ध करून द्यावे

0
65

अशी मागणी खेमराज नेवारे यांनी केली.

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बदलापूर येथील घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची स्थिती वाईट आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आले. याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक संसाधनांचा पुरेसा अभाव असणे हा सुद्धा आहे.
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसविण्यात यावे तसेच आधुनिक युगात विद्यार्थ्यांना कम्प्युटरच्या शिक्षणाची नितांत गरज आहे. जिल्हा परिषद शाळेत 12 th जनरेशनचे कम्प्युटर अजूनपर्यंत उपलब्ध नाही जर ते शाळेला उपलब्ध करून दिले तर शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविणे व इतर ऑनलाईन माहिती शासनाला पाठपुरावा करणे सोयीचे होईल.तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे व कम्प्युटर खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खेमराज भाऊ नेवारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांचेकडे गटशिक्षणाधिकारी देसाईगंज मार्फत केली. असा शैक्षणिक सवाल सर्व प्रथम गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण शाळांसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपस्थित केला.
याप्रसंगी खेमराज नेवारे यांच्या सोबत वैभव परशुरामकर, विलास बन्सोड कसारी, तुषार रहाटे,नरेश वासनिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here