विनोद कोल्हे भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष यांची मागणी
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – लातूर शहरात गेल्या आनेक वर्षांपासून विकास झालेला नाही शहरातील आनेक दलित वसत्या विकासापासून वंचित राहिले आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे कॉईल नगर, कॉईल नगर हे १९९३ पासून विकासाची वाट पाहत आहे यापूर्वी मंठाळे नगर येथील घरे पुनर्वसनाच्या नावाखाली कॉईल नगर येथे १९९३ साली तत्कालीन नगर पालिका यांनी स्थलांतर केले त्यानंतर १९९४ साली कोयना नगर येथील लोकांना कॉईल नगर येथे पुनर्वसनाच्या नावाखाली स्थलांतरित केले तरी येथील नागरिकांचा आद्याप विकास झालेला नाही, किंवा विकास काय असतो हेही येथील नागरिकांना माहित नाही, येथील राजकारणी लोकांना कॉईल नगर हे दिसत नसावे किंवा कॉईल नगर विषयी यांची मनातून मानसिकता नसावी असे वाटते शासनाच्या नियमानुसार १९९५ पासूनच्या सर्व झोपडपट्या ह्या त्याच ठिकाणी कायम केल्या जातील आणी त्यांचे पुनर्वसन केले जाईल आसा निर्णय असून हि कॉईल नगर चा विकास नाही, दिवंगत विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना येथील ४५० घरांना पुनर्वसनाच्या नावाखाली दोन माजली बिल्डिंग मध्ये शिफ्ट केले आहे त्यांना हि पाण्यासाठी कसरत करावी लागते तळ मजल्यावरून घागरीने दुसऱ्या मजल्यावर पाणी घेऊन जावे लागते, त्या ठिकाणी स्वच्छता दिसून येत नाही
तसेच पुनर्वसनापासून आणखीन ४५० घरे हे वंचित आहेत हे लोक पत्र्याच्या घरात वास्तव्य करत आहेत कालच्या पावसात येथील प्रत्येकाच्या घरात गटारीचे घाण पाणी शिरले आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही भिम आर्मीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भिम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख विलास आण्णा चक्रे यांनी मुंबई येथील मंत्रालयात जाऊन कॉईल नगर येथील नगरिकांना कायम स्वरूपी मुंबई पुणे प्रमाणे 1BHK घरकुल मंजूर करुन द्यावे असे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यायत आले आहे.

