prabodhini news logo
Home ईगतपुरी जाचकवस्ती येथील वादग्रस्त ड्रेनेज कामाचे एस्टीमेट उपलब्ध – ग्रा.पं. प्रशासनाकडून मोठा खुलासा

जाचकवस्ती येथील वादग्रस्त ड्रेनेज कामाचे एस्टीमेट उपलब्ध – ग्रा.पं. प्रशासनाकडून मोठा खुलासा

0
217

लबाड स्वयंघोषित ठेकेदार सुशील पवार यांनी नागरिकांची दिशाभूल करू नये- संतप्त नागरिक

इंदापूर (जाचकवस्ती) महेश कदम – दि. 28, इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती गावात संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग लगत असलेल्या 20 फुटी अंतर्गत रोड वर प्रवीण थोरात यांच्या जागेपासून ते गणेश पाटोळे यांच्या घरापर्यंत चाललेले बंदिस्त गटार काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने आणि त्या कामामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने येथील नागरिकांनी ते काम थांबवले होते..

याबाबत स्वयंघोषित ठेकेदार सुशील पवार यांनी आणि त्यांच्या बगलबच्यांनी येथील नागरिकांना धमाकावण्याचा देखील प्रकार समोर आला होता…याबाबत ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रार करून देखील ग्रा. पं. प्रशासनाने कोणतीच दखल न घेता या कामाबाबत आमच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले होते…

गोरगरीब, कष्टकरी, हातावरचे पोट असणारी लोकं आपल्या कुटुंबासोबत या परिसरात राहत असून येथील त्यांच्या जीवितास काही बरं वाईट झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न या परिस्थितीमुळे नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

यावर काही माध्यमानी बातम्या प्रकाशित केल्यावर ग्रा.पं. प्रशासनाला खडबडून जाग आली आणि या प्रकरणाची दखल घेत येथील नागरिकांशी संपर्क केला आणि या कामाचे एस्टीमेट आपल्याकडे आले आहे ते आपल्याला देखील दिले जाईल, वर्क ऑर्डर पण लवकरच येईल, ठेकेदाराने विनपारवाना काम चालूच केले कसे? त्याबद्दल आम्ही कारवाई करू आणि येथील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी ग्रा. पं प्रशासन घेईल असे आश्वासन दिले.

काहीच दिवसापूर्वी लबाड ठेकेदार सुशील पवार यांनी येथील नागरिकांना हे खाजगी काम मी स्वखर्चाने करून देत आहे,या कामाचे कोणतेही एस्टीमेट नाही, हे काम कोणत्याही शासकीय योजनेतून करत नाही असे सांगितले होते, त्यामुळे कोणीही हे काम थांबवू शकत नाही असे म्हणत नागरिकांची मोठी दिशाभूल केली होती… त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

ग्रा. पं. प्रशासनाने आणि लबाड स्वयंघोषित ठेकेदार सुशील पवार यांनी संगणमताने तर नागरिकांची दिशाभूल केली नसेल ना ?? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे

या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांनी दखल घेऊन सदरील बंदिस्त गटार कामाची सर्व अधिकृत कागदपत्रे घेऊन, या कामा संदर्भातील सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना बोलावून या कामाची काय परिस्थिती आहे, कामाचा दर्जा कसा आहे ? येथील नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयबाबत येथील नागरिकांची सार्वजनिक बैठक घेणे अपेक्षित होते मात्र अद्याप याठिकाणी नागरिकांचे हाल पाहण्यासाठी कोणीही आले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे का? हे पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here