कामगार कल्याणच्या महिला नाट्य स्पर्धेत हिरकणी नाटक प्रथम

0
447

प्रशांत रामटेके संपादक, चंद्रपूर – ललित कला भवन चंद्रपूर येथे महिला नाट्य महोत्सव स्पर्धा संपन्न चंद्रपूर:-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागतर्फे चंद्रपूर गटकार्यालय अंतर्गत ललित कला भवन, बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे गट कार्यक्रम महिला नाट्य महोत्सव स्पर्धा दिनांक २६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मा. रविराज ईळवे कल्याण आयुक्त, मुंबई व मा. नंदलाल राठोड उपकल्याण आयुक्त नागपूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

या स्पर्धेचे उद्घाटन मा. सुरेश तुम्मे गुणवंत कामगार, मा. श्रीमती वीर पत्नी रंजना घटे, परीक्षक गण व कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महिला नाट्य महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एम.पी.मडावी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर व प्रमुख पाहुणे मा. देवराव कोंडेकर जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व परीक्षक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सदर स्पर्धेचे संपूर्ण परीक्षण मा. सुशील सहारे ,मा.सौ निशाताई धोंगडे मा. संतोष बारसाकडे परीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांमधून एकूण आठ संघ सहभागी झाले होते.
या दोन दिवसीय महिला नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नगीना बाग वसाहत, चंद्रपूर *हिरकणी* या नाटकाने पटकावला तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, वर्धा *गिव्ह मी सम सनशाइन* या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला तर कामगार वसाहत सिंधी मेघे वर्धा यांनी *पुढील तपास सुरू आहे* या नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय महिला प्रथम क्रमांक वृंदा काळे, द्वितीय क्रमांक सुविधा झोटिंग, तृतीय क्रमांक नंदा मुन यांनी पटकाविला. स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शक पारितोषिक प्रथम वृंदा काळे, द्वितीय सुविधा झोटिंग,तृतीय सुनीता सूर्यवंशी यांनी पटकाविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर अळणे, कामगार कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी तर सूत्रसंचालन देवेंद्र दत्त कल्याण निरीक्षक यांनी केले व आभार किरण उपरे शिशु मंदिर शिक्षिका ललित कला भवन,चंद्रपूर मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर गटातील पूर्ण कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदरच्या कार्यक्रमाकरिता तिन्ही जिल्ह्यांमधून कामगार व कुटुंबीय ,कलावंत यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here