जागरूक नागरिकांमुळे ड्रेनेज कामाचा 10 लाख रुपयांच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न फसला…!!
इंदापूर (जाचकवस्ती) महेश कदम – दि. 01 ऑक्टोबर, इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती गावात संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग लगत असलेल्या 20 फुटी अंतर्गत खाजगी मालकी हक्क असणाऱ्या रोड वर प्रवीण थोरात यांच्या जागेपासून ते गणेश पाटोळे यांच्या घरापर्यंत चाललेले बंदिस्त गटार काम हे चुकीच्या पद्धतीने आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने आणि त्या कामामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने येथील नागरिकांनी ते काम थांबवले होते..
ड्रेनेज च काम मी स्वखर्चाने करून देतोय असा श्रीमंतीचा आव आणून आणि अशी दिशाभूल करून नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करण्याचा देखील प्रयत्न या ठेकेदाराने केला होता…याबाबत विचारल्यावर या स्वयंघोषित लबाड मुजोर ठेकेदार सुशील पवार यांनी आणि त्यांच्या बगलबच्यांनी येथील नागरिकांना धमाकावण्याचा प्रकार देखील समोर आला होता…याबाबत तक्रार ही करण्यात आली होती…याबाबत काही माध्यमामधून बातम्या ही प्रकाशित करण्यात आल्या होत्या… त्यामुळे सरपंच प्रतिनिधी महेश निंबाळकर यांनी गैरसोईबाबत विचारण्यासाठी येथील नागरिकांशी फोन वरून तरी संपर्क केला होता… परंतु मुजोर ठेकेदार अद्यापही कामाच्या ठिकाणी आला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण घडामोडीनंतर ग्रा.पं. प्रशासनाने या कामाची मंजुरी जि.प पुणे यांच्याकडून आहे आणि या कामाचे 10 लक्ष रुपयांचे मंजूर एस्टीमेट आपल्याकडे आले आहे ते आपल्याला देखील दिले जाईल, वर्क ऑर्डर पण लवकरच येईल, सुशील पवार या ठेकेदाराने विनपारवाना काम चालू केलेच कसे? त्याबद्दल आम्ही कारवाई करू आणि येथील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी ग्रा. पं प्रशासन घेईल असे आश्वासन ही दिले होते…
गोरगरीब, कष्टकरी, हातावरचे पोट असणारी लोकं आपल्या कुटुंबासोबत या परिसरात राहत असून येथील त्यांच्या आणि त्यांच्या लहान-लहान मुलांच्या जीवितास काही बरं वाईट झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न या नागरिकांमधून उपस्थित होत आहे…चुकीच्या पद्धतीने खोदकाम करून या ठेकेदाराने संपूर्ण रस्त्याची दुरावस्था केली आहे त्यामुळे याठिकाणी एखादी दुर्घटना होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रा. पं. प्रशासनाने आणि लबाड मुजोर स्वयंघोषित ठेकेदार सुशील पवार यांनी संगणमताने नागरिकांची फसवणूक करू नये असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे…
तसेच हाच लबाड स्वयंघोषित ठेकेदार मागील काळात सरपंच असताना संपूर्ण जाचकवस्ती गावात अशाच प्रकारची निकृष्ट दर्जाची विकास कामे करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी लाटल्याची चर्चा देखील येथील ग्रामस्थामधून ऐकाला मिळत आहे…तसेच विद्यमान सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे लबाड ठेकेदाराला या प्रकरणातून वाचवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करत असल्याची ही कुजबुज ग्रामस्थामधून ऐकाला मिळत आहे…
काही महिला ग्रा.पं. सदस्य असताना त्यांचे पती मीच ग्रा.पं. सदस्य आहे असे सांगून नागरिकांना धमकावत असल्याच्याही घटना समोर येत आहेत…महिलांना घरी बसवून त्यांचे पतीच ग्रा. पं. कार्यालयातील कारभार पाहत असल्याच्या चर्चा ग्रामस्थामधून ऐकाला मिळत आहेत…ही बाब अत्यंत गंभीर असून जाचकवस्ती ग्रापंचायत वर प्रशासक नेमण्याची आवश्यकता असल्याचे येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांनी दखल घेऊन या कामा संदर्भातील सर्व कागदपत्रे तपासून संबंधित अधिकारी, इंजिनिअर, ठेकेदार यांना बोलावून या कामाची काय परिस्थिती आहे, कामाचा दर्जा कसा आहे ? येथील नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयबाबत येथील नागरिकांची सार्वजनिक बैठक घेणे अपेक्षित होते मात्र अद्याप याठिकाणी कोणीही अधिकृत व्यक्ती आले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे का? हे पाहणे गरजेचे आहे.

