धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) – धुळे- महाराष्टाचे माजी मंत्री आणि खान्देश नेते स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेतेही उपस्थित होते. नाशिक जिल्हयातील काँग्रेस पदाधिकार्यांनी माजी मंत्री स्व.पाटील यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
दरम्यान माजी मंत्री स्व.रोहिदास पाटील यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामतीर्थात विधीवत विसर्जन करण्यात आले.खान्देश नेते स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि.27 सप्टेंबर रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अपर्ण करण्यासाठी सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी नाशिकच्या पंचवटी येथे नाशिक जिल्हा काँग्रेसतर्फे व विरोधी पक्षांच्यावतीने श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित पदाधिकार्यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नाशिक व जिल्ह्याच्या विकासातील योगदानाबद्दलच्या आठवणी जागविल्या. माजी मंत्री स्व.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन उपस्थित पदाधिकार्यांनी आदरांजली वाहिली. दरम्यान माजी मंत्री स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या अस्थींचे सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी गोदावरीत ज्येष्ठ सुपूत्र विनय पाटील, कन्या डॉ.स्मिता पाटील,नातू रायबा पाटील यांच्या हस्ते विधीवत विसर्जन करण्यात आले. अस्थी विसर्जनावेळी जावाई डॉ.चंद्रशेखर पाटील, डॉ.शैलेंद्र पाटील,डॉ.ममता पाटील,स्नुषा सौ.रुची विनय पाटील, डॉ.नकुल पाटील, नात अहिल्या कुणाल पाटील उपस्थित होते. तर अभिवादन कार्यक्रमाला खा.शोभा बच्छाव, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ज्येष्ठ सुपूत्र विनय पाटील, गुजरात विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते परेश धनाणी, माजी आ.वसंत गिते, शरद आहेर, डॉ.दिनेश बच्छाव, श्री बंकट पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, नितीन भोसले, अॅड.नितीन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.आकाश छाजेड, विजय राऊत, डॉ.हेमलता पाटील, डॉ.सुभाष ठाकरे, माजी नगरसेवक शाहू खैरे, आर.आर. पाटील, डॉ.ममता पाटील, वत्सला खैरे, स्वाती जाधव, गुरुमित बग्गा, राहूल पाटील,केशव पाटील उत्तमराव पाटील तसेच धुळे येथून बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,संचालक गुलाबराव कोतेकर, संचालक साहेबराव खैरनार,शशीकांत रवंदळे, विशाल सैंदाणे,एन.डी.पाटील, रावसाहेब पाटील, विश्वास शिंदे, कुणाल पाटील,जि.प.सदस्य अरुण पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील,बापू खैरनार, राजीव पाटील,भटू चौधरी, गणेश गर्दे, पप्पू भदाणे,हरिष पाटील आदी उपस्थित होते.

