राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ब्रम्हपूरीत रॅली

0
50

युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर- जगाला सत्य व अहींसेचा संदेश देणारे, थोर क्रांतिकारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ब्रम्हपूरी शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती समीतीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.

दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ब्रम्हपूरी शहरातील हुतात्मा स्मारक ते बाजार चौक पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील गांधीजयंती निमित्त आयोजित रॅलीत गांधीजींची वेशभुषा धारण करून नागभीड येथील रंदये हे सहभागी झाले होते. गांधीजींच्या जिवनावर आधारित प्रबोधनपर झाकी देखील गंगाबाई तलमले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या होत्या. या रॅलीत महीला व पुरुष भजनी मंडळे, गुरुदेव सेवा मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, गांधी विचारांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, तालुका काँग्रेस, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस तथा सर्व फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी बाजार चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर गांधी विचार हे आजही अजरामर असुन जनतेच्या मनामधील गांधीवाद कुणीही मिटवू शकणार नाही असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले. यानंतर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे व ईतर मान्यवरांनी यांनीही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड गोविंदराव भेंडारकर यांनी तर सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. व आभारप्रदर्शन खेमराज तिडके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here