चिचगाव येथे हनुमान मंदीराचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

0
73

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर – मा.ना.विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र) यांच्या विशेष प्रयत्नातून ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा. चीचगाव येथे हनुमान देवस्थान सभागृहाच्या बांधकामाकरीता १४.९२ लक्ष रु.चे मंजूर करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजा. चीचगाव येथे हनुमान मंदिर सभागृहाचे भुमिपुजन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे भूमिपूजन वनश्री शेंडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रा.डॉ.राजेश कांबळे (माजी समाज कल्याण सभापती जि.प) विलास विखार (जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी), किशोर राऊत संचालक कृ.ऊ बा.स), जगदीश पिलारे (जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस), ॲड.आशिष गोंडाणे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी देवराव अलोने (अध्यक्ष हनुमान देवस्थान कमिटी)
नरेश निकोडे (माजी सरपंच), पांडुरंग ठेंगरी (माजी अध्यक्ष तं.मु), अर्चना अलोने (ग्रा.पं सदस्य), रामदास वलके,नवलाजी अलोने, बाजीराव अलोने,राकेश खरकाटे , देवराव अलोने, मारोती अलोने, उमेश अलोने,दादाजी राऊत, चंदुजी अलोने, विलास राऊत,जगदिश अलोने यांच्यासमवेत गावातील बहुसंख्य मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here