कोपरगाव मधील अवैद्य धंदे बंद झाले पाहिजे यासाठी विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरू

0
66

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 – कोपरगावमध्ये वाढेलेली गुन्हेगारी आणि अवैध धंदे तत्काळ बंद व्हावे यासाठी कोल्हे गटाने पुकारलेल्या आमरण उपोषणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गोळीबार प्रकरणातील जखमीने नावं घेतलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या आमरण उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे..

शहर भयमुक्त करण्यासाठी आणि अवैध व्यवसाय बंद करून वाढती व्यसनाधिनता तसेच वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा ही जनहिताची भूमिका देखील यावेळी घेण्यात आली आहे.

याप्रसंगी डि. आर. काले, काकासाहेब कोयटे, संजय सातभाई, दिलिप दारुणकर, अतुलशेठ काले, योगेश बागुल, रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, अनिलदादा जाधव, जनार्दन कदम, विवेक सोनवणे, बबलु वाणी, विनोद राक्षे, संदिप देवकर, विजय आढाव, वैभव गिरमे, खालिकभाई कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान, गोपीनाथ गायकवाड, रवींद्र रोहमारे, सलिम पठाण, जयप्रकाश आव्हाड, महेश खडामकर, दिपक जपे, मुकुंद उदावंत, रमेश भोपे, रोहिदास पाखरे, निखिल वर्मा, कैलास नागरे, बापु पवार, सागर राऊत, पप्पू पडियार, विजय चव्हाणके, सिध्दार्थ पाटणकर, सोमनाथ म्हस्के, विजय बंब, सुधीर डागा, अनिल गायकवाड, अर्जुन मरसाळे, दिपक गायकवाड, शंकर बिर्हाडे, आयात शेख, सुजल चंदनशिव, फकिरा चंदनशिव, प्रदिप नवले, अशोक नाईकुडे, रुपेश सिनगर, आदी मान्यवरांसह कोरगांवकर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here