आदर्श नवयुवक कबड्डी क्लब यांच्या सौजन्याने भव्य डे कबड्डी सामने बाजार चौक रांगी (जमि.)ता.धानोरा येथे भव्य पटांगणावर आयोजित
धानोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिं.०४ ऑक्टोंबर २०२४ आदर्श नवयुवक कबड्डी क्लब यांच्या सौजन्याने भव्य डे कबड्डी सामन्याचे आयोजन बाजार चौकातील पटांगणात रांगी जमि.ता.धानोरा येथे करण्यात आले होते.
या कबड्डी सामन्याच्या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्या शुभहस्ते फित कापून व खेळाडूंना हस्तांदोलन करत उपस्थित पार पडला.
या कबड्डी सामने स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.खा.अशोक नेते यांनी उद्घाटन स्थानावरून बोलतांना म्हणाले कबड्डी हा खेळ सांघिक खेळ आहे. या सांघिक खेळात मन उत्साही व शरीर तंदुरुस्त ताकदवर बनते. अतिशय चांगला मैदानी खेळ या ठिकाणी आयोजित केला.या कबड्डी सामन्याच्या स्पर्धेला मी शुभेच्छा देतोय स्पर्धामध्ये पंचाची भुमिका अतिशय महत्त्वाची असते या कबड्डी स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम मानूनच खेळ खेळावा.यात कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न करता खेळ खेळावे.दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी दुर्गा मातेच्या सर्व समस्त जनतेला शुभेच्छा देतोय असे प्रतिपादन मा.खा.नेते यांनी या कबड्डी सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याबरोबरच पुढे बोलतांना मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे लोकसभा क्षेत्रात केलेली आहे.तसेच या प्रसंगी मला रांगी जमि.गावातल्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. असा विश्वास देतोय. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.असे प्रतिपादन या उद्घाटन सोहळा प्रसंगी मा.खा.नेते यांनी केले.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस – २०,००१/- मा.खा.नेते यांचेकडून -द्वितीय बक्षीस १५,००१/- डॉ. मिलिंद जी नरोटे यांचेकडून तर, तृतीय पुरस्कार १०,००१/- देवनाथ पुडो,शशिकांत साळवे,साजन गुंडावार, सारंग साळवे, सामूहिकरीत्या यांचे कडून.अशा पद्धतीचे कबड्डी स्पर्धेचे बक्षीस आयोजित करण्यात आले.
यावेळी कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चा चे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे, भाजपा नेते तथा कृ.उ. बा. स. सभापती शशिकांतजी साळवे,सरपंच फालेशवरी गेडाम,RFO रामगुंडावार, उपसरपंच नुरज हलामी, डॉक्टर हलामी सर, ग्रामपंचायत सदस्या विदया कपाट, शशीकला मडावी,अर्चना मडावी,भाजपा नेते देविदास नागरे,नरेंद्र भुरसे,जगदिश कन्नाके, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम भुरसे,ग्रा.प. सचिव बांबोळे जी,प्रल्हाद उंदिरवाडे, श्रावणजी देशपांडे, प्रदिप गेडाम,पराग देशपांडे, विनोद कन्नाके,निखिल पुडो,नितेश गेडाम, कैलास मडावी, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते.

