ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात रस्ते विकासासाठी ५४ कोटींचा विकास निधी मंजुर

0
138

विरोधी पक्षनेते विजय वडे्टीवारांच्या प्रयत्नांचे फलित – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ते विकास

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर – क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीकोन, जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्याची धडपड, आणि विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून ब्रह्मपुरी मतदार संघात आजवर कोट्यावधींची विकास कामे मंजूर झाली व ती पूर्णत्वासही आली आहे. तर क्षेत्रातील उर्वरित रखडलेल्या रस्त्यांच्या नवनिर्माणासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 54 कोटींच्या विकास निधीस मंजुरी मिळाली असून लवकरच ही कामे पूर्ण होणार आहे.

एक जागरूक व जनहितकारी कार्यासाठी कटीबद्ध असलेले कणखर नेतृत्व म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे होय. सत्ता असो अथवा नसो मात्र विकासाच्या बाबतीत कुठलीच तडजोड न करता जनतेच्या प्रश्नांना आपल्या विशेष शैलीतून शासन स्तरावर मांडून विरोधकांना घाम फोडणे हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निराळा अंदाज आहे. त्यांच्या कारकीर्दीत संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ना भूतो न भविष्यती असा विकास साधला गेला असून आजही त्यांच्या विकास कामांचा झंजावात जोमाने सुरू आहे. नुकताच त्यांनी शासन स्तरावर सततचा पाठपुरवठा करून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण मार्गाच्या नवनिर्माणासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 54 कोटींचा विकास निधी मंजूर करून घेतला. यात सावली तालुक्यातील नवेगाव चेक विरखल ते विरखल चेक सिमेंट रस्त्यासाठी 7 कोटी 77 लक्ष, प्रजिमा -29 बेलगाव ते राजोली चक सिमेंट रस्त्यासाठी, 1 कोटी 93 लक्ष, प्रजिमा- 29 मुख्य रस्ता ते गेवरा बूज- कसरगाव- विहीरगाव- बोरमाळा पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी 12 कोटी 70 लक्ष, अंतरगाव ते गायडोंगरी सिमेंट रस्त्यासाठी 3 कोटी 90 लक्ष, प्रजिमा – 177 ते सिंगापूर सिमेंट रस्त्यासाठी 3 कोटी 90 लक्ष, सिंदेवाही तालुक्यातील खातगाव – भेंडाळा ते प्ररामा – 9 पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी 2 कोटी 57 लक्ष, देलनवाडी ते नांदगाव सिमेंट रस्त्यासाठी 4 कोटी 5 लक्ष, ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रजिमा -29 मुख्य रस्ता मूळझा – बल्लारपूर- पद्मापूर -भुज पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी 14 कोटी 54 लक्ष अशा एकूण 54 कोटी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून होऊ घातलेल्या या नवनिर्माणाधिन रस्त्यांमुळे नागरिकांच्या प्रवासातील अडचणी कायमस्वरूपी दूर होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here