प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कुरखेडा- झाडीबोली साहित्यमंडळ चंद्रपूर शाखा ब्रम्हपुरी द्वारा आयोजित झाडीबोली शब्दसाधक पुरस्कार वितरण थाटात पार पडले झाडीबोली भाषा टीकावी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील विविध साहित्यिकांना शब्दसाधक पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच एप्रिल,मे,जून या तीन महिन्यात काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आले.या स्पर्धेत शेकडो कवीं सहभागी झाले होते.त्यात १५ स्पर्धकांना याच बहारदार कार्यक्रमात झाडीबोली प्रीमियर लीग स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. हिंगोली येथील बबन शेळके, चंद्रपूर देवाडा येथील प्रसिद्ध गजलकारा मा.शीतल कर्णेवार आणि कुरखेडा येथील सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड यांना काव्यरत्न पुरस्कार देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या उदघाटकीय स्थानी ब्रम्हपुरीच्या माजी नगराध्यक्ष सौ.रिता उराडे ह्या होत्या तर अध्यक्षस्थानी केंद्रीय समिती सदस्य मा.बंडोपंथ बोढेकर हे होते, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया या चारही जिल्ह्याचे झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष मा.अरुण झगडकर ,विनायक धानोरकर,कुंजीरम गोंधळे व मुरलीधर खोटंले हे प्रामुख्याने उपस्थित होते,तर विशेष अतिथी म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध कवी मा. अस्थीन चौरे,प्रा.डाँ धनराज खानोरकर आणि समाजसेविका, स्तंभलेखिका मा.कल्पना गेडाम ह्या होत्या.

