व्यसनमुक्ती प्रचारक हभप लोमेश चौधरी यांचा वाढदिवस ब्रम्हकुमारीज मुख्यालयात साजरा होणे हे त्यांचे अहोभाग्य.-अशोक उपाध्ये.

0
68

शारदा भुयार महिला जिल्हा प्रतिनिधी, वाशिम- पत्रकारांना प्रोत्साहन देऊन पत्रकारांचे हित जपण्याच्या निःस्वार्थ उद्देशाने प्रजापिता ब्रम्हकुमारीज विश्व विद्यालयाकडून गेल्या पंचवीस वर्षापासून,अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलन (मिडीया कॉन्फरन्स) चे आयोजन केल्या जाते.यावर्षी दि. 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत आयोजीत पत्रकार महासंमेलनाला वाशिम व अकोला येथील बरेचशे पत्रकार ब्रम्हकुमारीज केन्द्र कारंजा द्वारा सहभागी झाले होते.त्यामधील मानोरा तालुक्याचे साप्ताहिक करंजमहात्म्य आणि साप्ताहिक पहाटवारा वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून हभप लोमेश पाटील चौधरी हे देखील एक होते. आणि योगायोगाने त्यांचा वाढदिवस दि 30 सप्टेंबर 2024 रोजी होता.त्यामुळे वाशिम अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्रमंडळीनी एकत्र येत माऊंट आबू येथील आनंद सरोवराच्या “ज्ञानसरीता” सभागृहामध्ये,सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा.अशोकराव उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली लोमेश पाटील चौधरी यांचा वाढदिवस साजरा केला.यावेळी आनंदी संध्या साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये म.रा.शिक्षक परिषद कार्यकारिणी सदस्य प्रा. शंकरराव पुंड, ब्र.कु. रामदेव भाई (माऊंट आबू) विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष,संत गाडगे बाबा स्वच्छतादूत राष्ट्रिय पुरस्कार आणि व्यसनमुक्ती सेवा महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे हे होते. याप्रसंगी लोमेश चौधरी यांचे सर्वांनी औक्षवाहन करून, पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवीत लोमेश चौधरी यांचे अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्यात. आपल्या अध्यक्षीय संभाषणातून बोलतांना प्रा.अशोक उपाध्ये म्हणाले की, “पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरवरी पर्वत रांगाच्या निसर्गरम्य माऊंट आबू शिखरावर ब्रम्हाकुमारीजच्या मुख्यालय असलेल्या आनंद सरोवरातील ज्ञानसरिता सभागृहात शिवबाबा ब्रम्हा बाबा यांच्या पवित्रपावन भूमीमध्ये हभप लोमेश चौधरी यांचा वाढदिवस साजरा होणे म्हणजे त्यांचे परमभाग्य आहे. ते खरोखरीच पुण्यात्मा आहेत. त्यांना निरोगी आरोग्य व उदंड आयुष्याकरीता आमच्या शुभेच्छा आहेत. तर संजय कडोळे म्हणाले, “आमचे साप्ताहिक करंजमहात्म्य हे वृत्तपत्र आम्ही केवळ धार्मिक, आध्यात्मिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक चळवळीच्या उद्देशाने चालवीत असून,आमच्या वृत्तपत्रात राजकारण,फेकन्यूज,अपराधीक वृत्तांत,टिकाटिप्पणी दर्शवून सर्वसामान्य नागरिकांची मने (अंतःकरण) दुखवीणाऱ्या बातम्या आम्ही प्रकाशित करीत नाही.तसेच अवैध व्यावसायिकांच्या जाहिराती किंवा आर्थिक सहकार्य स्विकारत नाही.त्यामुळेच हभप लोमेश पाटील चौधरी यांचे सारखे निर्मळ व प्रांजळ पत्रकार आमच्या सोबत जुळलेले आहेत. लोमेश चौधरी यांचे जनजागृतीचे सेवा कार्य विराट स्वरूपाचे आहे. आणि असे असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या साप्ताहिक करंजमहात्म्यच्या मानोरा तालुका प्रतिनिधीचा वाढदिवस स्वर्गासमान असलेल्या शिवबाबाच्या पवित्र पावन धरतीवर साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे त्यांच्यासह आमचे अहोभाग्य आहे. शिवबाबा ब्रम्हा बाबाच्या कृपाशिर्वादाने निश्चितच आजपासून लोमेश चौधरी यांचे आयुष्यमान वाढणार आहे. त्यामुळे लोमेश चौधरी यांचे त्रिवार अभिनंदन ! हार्दिक शुभेच्छा ! त्यांचे स्नेहपूर्वक वंदन !!” यावेळी कार्यक्रमा करीता कारंजा येथील विजय पाटील खंडार,प्रदिप वानखडे अकोला येथील सुधाकर इंगोले, गजानन हरणे,संजय गावंडे, ओमप्रकाश गुप्ता,नांदेडचे मनोज काठोळे,ठाणे मुंबईचे काळूराम भोईर,रविद्र गोतिरणे सुनिल फर्डे,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक संजय कडोळे यांनी तर समरोपिय संभाषण गजानन हरणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here