टायगर ग्रुप पांढरकवडा यांनी शिक्षक दिन केला साजरा

0
71

केळापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- टायगर ग्रुप चे संस्थापक पैलवान जालिंदर जाधव व टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप पांढरकवडा तर्फे शिक्षक दिनानिमित्त गाडगे महाराज आश्रम शाळा अकोली (खु) तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथील आश्रम शाळेत शालेय साहित्य वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी केळापूर तालुक्याचे माजी आमदार राजूभाऊ तोडसाम व टायगर ग्रुप पांढरकवडा चे पुढील सदस्य कुणाल रोडे, दर्शन धानोरकर, अभय गावंडे,अक्षय वैद्य ,अंकित ठाकरे, अजिंक्य चटाले, दिव्यांशू खडसे, हर्ष शेंडे,सतीश गुरनुले हे सदस्य उपस्थित होते तसेच शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थी हे देखील जास्तीत जास्त संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here