दानशूरांनी पुण्यमिळविण्याकरीता,आपले दान मंदिराच्या दानपेट्यांपेक्षा, गरजू जीवंत व्यक्ती करीता सत्पात्री करायला हवे -संजय कडोळे.

0
114

शारदा भुयारमहिला जिल्हा प्रतिनिधी, वाशिम- कारंजा (लाड) दिवसेंदिवस एकीकडे समाजातील गोरगरीब जास्तित जास्त गरीब होत आहेत.तर श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत असून समाजात आर्थिक विषमतेची दरी सातत्याने वाढतच आहे. त्याशिवाय रक्तदाब आणि मधुमेह या आजारामुळे हृदय विकार,अर्धांगवायू इ. आजार आणि अपघाताने दरडोई दवाखान्या मध्ये आजार ग्रस्ताची संख्या वाढून त्यांना मोठमोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी आर्थिक चणचण भासते. शिवाय घरातील कर्त्या पुरुषाचे दुर्धर आजार किंवा अपघाताने अकाली निधन झाल्यामुळे त्याचे माघारी त्याची म्हातारी आई वडिल, पत्नी व चिमणी पाखरे असलेली लहान लहान मुले असे संपूर्ण कुटुंबच अनाथ,निराधार व आर्थिक स्त्रोत नसल्याने बेसहारा होते.त्यामुळे अशा जीवंत दैवत असलेल्या मुर्त्यांना समाजातील दानशूरांची गरज असते.आज आपण पहातो.सध्या समाजात प्रचंड अंधविश्वास आणि धार्मिकता वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये लाखो करोडोच्या देणग्या दानशूराकडून दिल्या जातात.आणि त्या दानाचा उपयोग आरोग्य विषयी, शैक्षणिक व सामाजिक गरजा पूर्ण करण्याकरीता नव्हे तर केवळ आणि केवळ मंदिराचे मालक आणि पुजाऱ्याची पोटे भरण्यासाठी केला जातो. एखादेवेळी जर ई डी, इन्कमटॅक्स,चॅरिटरी कमिश्नर यांनी प्रत्येक लहान मोठया मंदिरावर धाडी टाकून यांचा हिशेब घेतला तर पुजाऱ्यांना दानामधून मिळालेली अमाप धनसंपत्ती पाहून ई डी, इन्कमटॅक्स,चॅरिटरी कमिश्वर यांचे देखील डोळे आश्चर्याने पांढरे झाल्या शिवाय राहणार नाहीत. खरेतर ह्या धनाचा उपयोग गरजू गोरगरीब दुर्धर आजार ग्रस्त आणि गोरगरीब व्यक्तीच्या मुलाबाळाच्या शिक्षणाकरीता आणि अन्नछत्र व सामाजिक कार्यासाठी व्हावयास हवा आहे. त्यामुळे आता समाजातील दानशूरांनी पुण्य मिळविण्याकरीता,आपले दान मंदिरामधील दानपेटीत टाकण्यापेक्षा सत्पात्री दान करण्याच्या दृष्टिने कर्मयोगी संत गाडगे बाबाच्या दशसुत्री संदेशाला अनुसरून समाजातील जीवंत दैवत असलेल्या गरजू गोरगरीब व्यक्ती करीता,त्यांच्या दुर्धर आजारा करीता,गरीबाच्या मुलांच्या शिक्षणा करीता आणि केवळ अन्नछत्र अन्नदानाच्या कार्यक्रम साठीच करून पुण्य मिळवीले पाहिजे.असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी मांडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here