कारंजेकरांचा निर्णय.
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – कारंजा – सर्वच राजकिय पक्षांनी विशेषतः महायुती,महाविकास आघाडी व त्यांच्या घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काहीतरी नितीमत्ता ठेवून,तिर्थक्षेत्र विकास,पर्यटन,उद्योगधंदे,उच्चशिक्षण,रोजगार, कृषी व सिंचन इ.विकासापासून कोसो दूर असलेल्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला न्याय दिला पाहिजे.त्यांनी येथील उमेद्वार जाहीर करण्यापूर्वी सर्वप्रथम स्थानिक मतदार राजाचे मनोगत जाणून घ्यावे. नंतरच उमेद्वार जाहीर करावा.तसेच आपला उमेद्वार ठरवितांना शक्यतो स्थानिक नेत्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.अन्यथा त्यांना व त्यांच्या राजकिय पक्षाला पराभवाची नामुश्की ओढवून घ्यावी लागेल.कारण ज्या उमेद्वाराचे नाव यापूर्वी मतदार संघात कुणी ऐकलेले नाही.ज्याला यापूर्वी कधीच कुणी डोळ्याने पाहिले नाही.ज्या व्यक्तीचे यापूर्वी मतदार संघात कवडीचे सामाजिक कार्य नाही.कारंजा मानोरा येथील विकासासाठी कोणतेच योगदान नाही किंवा मतदाराशी नातीगोती वा संबंध नाही.असी कारंजा मानोरा मतदार संघाला आयते बिळ समजून येणारी बिनबुडाची व्यक्ती उमेद्वार म्हणून दिल्या गेली तर मतदारामध्ये त्या त्या पक्षाविषयी संतापाची भावना तयार होऊन वेळप्रसंगी प्रचंड बंडखोरी होणार आहे.मग त्यामध्ये अशा पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचे भाकीत ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले. कारंजा मानोरा येथील,अन्यायग्रस्त नेते,कार्यकर्ते, शेतकरी,व्यापारी,बेराजगार कामगार,बेकार मजूर,उच्च शिक्षणासाठी तडफडणारे विद्यार्थी,सुशिक्षीत बेरोजगार आणि सुज्ञ मतदार जनता -अशा बाहेरगावच्या उपऱ्या उमेद्वाराविरुद्ध व मग पर्यानाने त्या उमेद्वाराच्या राजकीय पक्षाविरुद्ध असंतोष प्रगट करून तिव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. येथील जनता यावेळी बाहेरगावच्या उमेदवाराविरुद्ध एकत्र येवून पेटून उठणार आहे.एवढा भयंकर विरोध आणि आंदोलन करण्याची तयारी येथील जनता मतदारांची आहे.येथील मतदार हा आता जागृत झाला आहे.पूर्वीसारखा तो दूधखुळा राहिलेला नाही.त्यामुळे लोकभावना लक्षात घेवूनच राजकिय पक्षांनी आपआपले उमेद्वार ठरवावे.अन्यथा त्यांचा पराभव निश्चित आहे.तसेच विविध पक्षाच्या स्थानिक नेते व कार्यकर्ते यांनी सुद्धा स्वाभिमान शून्य न होता आपल्या मतदार संघाची व मतदारांची थोडी तरी लाजलज्जा बाळगून राजकिय पक्षाकडे स्थानिक उमेद्वाराचीच मागणी रेटून धरावी.बस्स यापुढे स्व:स्वार्थासाठी बाहेरगावच्या उमेद्वाराची हाजी हाजी, गुलामगीरी आणि चमचेगीरी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी बंद केली पाहिजे.अन्यथा बाहेरचे अनोळखी उपरे उमेद्वारच यापुढे सत्ताधिश होत राहतील.आणि असे उपरे सत्ताधिश खातील तुपाशी आणि तुम्ही मरेपर्यंत राहणार उपवाशी ! स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजानी जसे देशाला गुलाम केले होते.तसेच बाहेरगावची उमेद्वार मंडळी तुमच्या टाळूवरील लोणी खात राहून तुमच्या मतदार संघाचा विकास करण्या ऐवजी तुमच्या मतदार संघातील तुमच्या हक्काचा विकास निधी त्यांच्याकडे पळवून आपल्या मतदार संघाला भकासच करीत राहतील. तुमच्या मुला बाळाचे भविष्य बिघडवतील.तुम्हाला मरेपर्यंत गुलाम,कंगाल,लाचार करतच राहतील तेव्हा मित्रांनो उठा ! जागे व्हा !! आणि ज्यांना स्वतःच्या गावात,मतदार संघात कोणतीच इज्जत मानदान सन्मान नाही.जे स्वतःच्या मतदार संघात निवडून येवू शकत नाहीत.तेच कारंजा मानोरा मतदार संघावर आपली दावेदारी करून अतिक्रमण करू पहात आहेत. हे ओळखून घेऊन त्यांना यावेळी आपण मतदारांनी परास्त केले पाहीजे.त्यांना त्यांच्या मुळ गावात पिटाळून लावले पाहिजे. त्याकरीता स्थानिक कारंजा मानोरा येथील कोणत्याही छोट्या मोठ्या पक्षाकडून किंवा अपक्ष उमेद्वारी दाखल करणाऱ्या एखाद्या स्थानिक व परिचित असणाऱ्या, प्रामाणिक गरजू व विश्वासू नेत्याला भावी आमदार म्हणून निवडून दिले पाहिजे.अशा स्थानिक मतदारांच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळविले आहे .

