सिन्नर विधानसभा मतदारसंघात म. वि. आ. चा उमेदवार कोण ?

0
115

ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग कोणत्याही क्षणी फुंकले जाण्याची शक्यता आहे.या पाश्र्वभूमीवर सिन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेआस (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार म्हणुन विदयमान आमदार माणिक कोकाटे यांचे नाव जवळपास निश्चिंत आहे. मात्र कोकाटे सारख्या मातब्बर उमेदवाराच्यां विरुद्ध म.वि.आ.कडे तगडा उमेदवारच नसल्याने कोकाटे विरुद्ध कोण या प्रश्नाचींच येथे जोरदार चर्चा सुरु आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघाची निवडणुक गेल्या पंधरा वर्षापासुन माणिकराव कोकाटे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशीच होत होती.
यापुर्वी दिवंगत मंत्री तुकाराम दिघोळे व माणिकराव कोकाटे अशी लढत होत होती.दिघोळेच्यां मृत्युनंतर ही लढत कोकाटे विरुद्ध वाजे अशी सुरु झाली.
सन २००९ च्या निवडणुकीत प्रकाश वाजे विरुद्ध माणिकराव कोकाटे अशी लढत झाली. यात कोकाटे यांनी बाजी मारली.
सन २०१४ च्या निवडणुकीत प्रकाश वाजे यांचे चिरंजीव राजाभाऊ वाजे यांनी रिंगणात उतरत माणिकराव कोकाटे यांचा निसटता पराभव केला. तर या पराभवाचे उट्टे सन २०१९ मध्ये काढत राजाभाऊ वाजे यांना पराभुत करत माणिकराव कोकाटे हे विजयी झाले.
यावेळी मात्र येथील परिस्थती लोकसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितरीत्या बदलली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उ.बा.ठा.गटाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितरीत्या लॉटरी लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उ.बा.ठा गटाकडुन त्यांना ध्यानीमनी नसतानां उमेदवारी मिळाली.आणि या निवडणुकीत चमत्कार होऊन ते निवडुनही आले.
आता राजाभाऊ वाजे हे खासदार झाल्याने विधानसभेला कोकाटे विरुद्ध प्रबळ उमेदवार कोण ? हा प्रश्न चर्चेला आला आहे.
वाजे खासदार झाल्याने शिवसेना उ.बा.ठा गटाचा दावाही येथे काहिसा कमजोर पडला आहे तर या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दावा ठोकत आहे.म.वि.आ. च्या जागावाटपात रा.कॉं.शरद पवार गटाला ही जागा जाण्याची शक्यता असुन सिन्नरचे युवा नेते उदय सांगळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सांगळे हे खासदार राजाभाऊ वाजे यांचेही मर्जीतले व विश्वासु मानले जात आहेत. सांगळे यांच्या यशस्वी राजकिय वाटचालीत खासदार राजाभाऊ वाजे यांचा मोठा वाटा मानला जातो आहे.
सांगळे यांना सिन्नर पंचायत समितीत, त्यांच्या सौभाग्यवती शितल सांगळे यांना जि.प. निवडणुकीत विजयी करण्यापासुन ते जि.प. अध्यक्ष करण्यापर्यंत वाजेनीं मोठी मदत करत महत्वाची भुमिका बजावली आहे.
त्यामुळे उदय सांगळे यांना खासदार राजाभाऊ वाजे यांची पसंतीच राहिल असा अंदाज आहे.
उदय सांगळे हे रा.कॉं.शरद पवार गट वा शिवसेना उ बा ठा गट या दोन्हीकडुनही लढु शकतात.
सांगळे हयांना राजकिय वारसा असुन त्यांचे वडिल पुंजाभाऊ सांगळे हे यशस्वी उदयोजक म्हणुन जिल्हयाला परिचीत आहेत.याशिवाय कॉंग्रेस पक्षाचे ते जुने नेते होते.
उदय सांगळे हे ही जिल्हा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष होते. योगायोग म्हंणजे विदयमान आमदार माणिकराव कोकाटे हे ही काही काळ जिल्हा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष होते व त्या नंतर ते आमदार झाले.
सिन्नर विधानसभा मतदारसंघात मराठा व वंजारी या दोन्ही समाजाचे प्राबल्य आहे.
पंधरा वर्षापुर्वी मराठा विरुद्ध वंजारी अशाच जात विभागणीवर येथील निवडणूका होत होत्या.
मात्र कोकाटे व वाजे यांच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत हा मुद्दा निकाली निघाला होता.
आता कोकाटे विरुद्ध सांगळे अशी लढत झाल्यास पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान सांगळे यांचे नावाबरोबरच यापुर्वी निवडणुक लढलेले मात्र पराभुत झालेले प्रकाश वाजे यांचेही नाव चर्चेत आहे.त्याच बरोबर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नीने उमेदवारी करावी अशीही मागणी होत आहे. मात्र यांस खासदार राजाभाऊ वाजे हे अनुकुल नसल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातुन प्रथमच सिन्नर तालुक्यातील व्यक्ती खासदार झाली आहे. या साठी तालुका वासीयांनी पक्षभेद विसरुन मोठया प्रमाणावर प्रचार व भरभरुन मतदान केले होते. आमदार माणिकराव कोकाटे हे महायुतीत सध्या असले तरी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनीही महायुतीसाठी फारशा तडफेने काम केले नाही असा बोलवा आहे.त्यामुळे वाजे यांना त्यांची अप्रत्यक्षरीत्या मदत झाल्याचीही चर्चा असुन याची परतफेड वाजे विधानसभा निवडणुकीत करतील अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
सांगळे, वाजे यांचेबरोबरच थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे, आक्रमक नेते म्हणुन ओळखले जाणारे शरद शिंदे, कृष्णा भगत, नामकर्ण आवारे, बाळासाहेब वाघ, छावाचे विलास पांगारकर, भाजपचे जिल्हा नेते पांडुरंग बर्हे, बाळासाहेब गाढवे, शेकापचे अशोक बोराडे आदी नावाचींही जोरदार चर्चा सुरु आहे.
मात्र येथे तगडा उमेदवार शोधण्यात म.वि.आ.ची दमछाक होतानां दिसते आहे. तर खासदार राजाभाऊ वाजे हे स्वत: चा मतदारसंघ म.वि.आ. ला जिंकुन देतील का ? कि अप्रत्यक्ष मदतीचे पांग फेडतील याचीही मोठी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here