वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सर्व राजकिय पक्षातील स्वंयघोषीत उमेदवारांच्या प्रचाराच्या धामधुमीत गावागावात जाऊन संपुर्ण मतदारसंघ पिंजुन काढणारा एकमेव उमेदवार धनशक्ती विरोधात जनशक्तीचा भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट हे सरस ठरत आहे.यांचा झंजावात सुरू असुन वणी,मारेगाव,झरी तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरी पोहोचण्याचे लक्ष साधत आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील बुथ बांधणी कार्यक्रमांतर्गत नरसाळा, बोटोणी, वेगाव,कोलगाव, कोरंबी मारेगाव, कुरई, ढाकोरीबोरी, डोर्ली,शेलु, नायगाव,कोना,सावर्ला येथे बुथ बांधणी करण्यात आली.याप्रसंगी भाकपचे राष्ट्रीय कौंसिलर कॉ. तुकाराम भस्मे, विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट, जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे, कॉ.ऋषी उलमाले उपस्थित होते. कॉ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वावर विस्वास ठेऊन वरील गावातील शेकडो नागरिकांनी भाकपमध्ये प्रवेश घेतला.

