म.वि.आ.तुन खोसकर बाहेर, कॉंग्रेस देणार नवा चेहरा ?

0
209

ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क-अखेर हो नाही, हो नाही करता करता आमदार हिरामन खोसकर हे पुन्हा एकदा स्वगृही म्हंणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) मध्ये परतले आहेत.खोसकर यांनी कॉंग्रेस ला सोडचिठ्टी दिल्याने अखेर कॉंग्रेस मधील इच्छुकानीं मोकळा श्वास घेतला आहे. आता या मतदारसंघातुन कॉंग्रेस ला पुन्हा नव्या चेहर्याचा शोध घ्यावा लागणार आहे. कॉंग्रेस कडुन इच्छुक असणार्याचें हौसले बुलंद झाले आहे. आता ते नव्याने फिल्डिंग लावण्यासाठी तयार झाले आहेत.
आमदार हिरामन खोसकर हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. ना.छगन भुजबळ यांचे ते खंदे समर्थक मानले जातात.त्यांनी जि.प.सदस्य, जि.प.सभापती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन कारकिर्द गाजवलेली आहे.
सन २०१९ चे विधानसभा निवडणुकीत ऐन तोंडावर कॉंग्रेसच्या तत्कालीन आमदार सौ.निर्मला गावित यांनी आकस्मातपणे कॉग्रेसला बाय बाय केल्याने कॉंग्रेस पक्षाला अखेर शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन उसना उमेदवार घ्यावा.राष्ट्रवादी कॉंग्रेस चे हिरामन खोसकर यांना कॉंग्रेस कडुन उमेदवारीही मिळाली आणि नशीबाने आमदारकीची लॉटरीही लागली.
ते कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत आमदार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे सबंध कायमच स्नेहपुर्ण राहिले. या बाबत प्रत्यक्ष स्थानिक कॉंग्रेस पदाधिकारीही कायम नाराजी व्यक्त करत होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर ना.छगन भुजबळ हे अजित पवार यांचे गोटात सामिल झाले होते.
दरम्यान राज्यसभा निवडणुकीत जी सात मते कॉंग्रेस आमदाराचीं फुटली होती, यात आमदार हिरामन खोसकर यांचेही नाव जाहिरपणे घेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धमाका केला होता.त्या नंतर आमदार हिरामन खोसकर यांनीही आपली बदनामी करण्याचा हा डाव आहे असे म्हणत पटोलेनां थेट शिंगावर घेतले होते.यामुळे पटोले व खोसकर यांचेत वादाची ठिणगी पडली होती.त्याचवेळी हिरामन खोसकर यांना कॉंग्रेस कडुन उमेदवारी दिली जाणार नाही हे स्पष्टं झाले होते.मात्र या नंतर खोसकर यांनी राहुल गांधी पासुन सर्वच दिग्गज नेत्याच्यां गाठीभेठी घेत डँमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला खरा.पण तो पर्यंत जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले होते.
दरम्यान या नंतर मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याही त्यांनी गाठी भेटी घेऊन चाचपणी केली होती.
अखेर हिरामन खोसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये परतले खरे पण महायुती मध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्याने पुढे नेमके काय ? महायुती मध्ये ही जागा शिवसेनेकडुन राष्ट्रवादी काँग्रेस ला सुटणार का ? राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पुढील संभाव्य उमेदवार असणार का ? शिवसेना ही जागा खुशीने सोडणार का ? असे विविध प्रश्न या निमित्ताने चर्चेत आले आहे.
दुसरीकडे आमदार हिरामन खोसकर हे कॉंग्रेस मधुन बाहेर पडल्याने नव्याने उमेदवार शोधण्याची नामुष्की पुन्हा एकदा कांग्रेस वर आली आहे.यात शिवसेनावासी झालेल्या माजी आमदार सौ.निर्मला गावित या पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या शिवाय ईगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे यांनी स्थानिक उमेदवार दयावा या मुद्दयावर दावेदारी ठोकली आहे.दुसरीकडे वैभव ठाकुर, लकी जाधव, अनिता घारे, उषा बेंडकोळी, डॉ शरद तळपडे आदीसह विविध नावाचीं जोरदार चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here