नागपूरच्या दिक्षाभुमीवर
निळ वादळ दुमदुमते
सोहळा हा धर्मांतराचा
आकाशी बघा चमचमते….
अनिष्ट रूढी परंपरेने
छळले आम्हा कैकदा
झुंज होती मरणाशी
लढा दिला अनेकदा….
माणूस माणसाच्या
स्पर्शाने होता बाटला
मरणयातना सोसुनी
पाण्याशिवाय आटला….
हाती घेतले पुस्तक
लेखणीची केली तलवार
गुरू मानले शिक्षणाला
मात केली अन्यायावर…..
आता उसळला हा समुदाय
गर्जना झाली भुवरी
तुझेच धम्मचक्र हे
फिरे जगावरी…….
कवयित्री सारिका डी गेडाम,S@
चंद्रपूर

