ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ईगतपुरी चे शिवसेना नेते तथा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना आदिवासी महामंडळाच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. हया अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त आहे. ईगतपुरी तालुक्यातील माजी आमदार शिवराम झोले यांचे नंतर प्रथमच राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त महामंडळ मिळाल्याने ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकानीं जोरदार जल्लोष केला आहे.
दरम्यान मेंगाळ यांना खुॉश केल्यानंतर महायुतीकडुन विधानसभेची उमेदवारी विदयमान आमदार हिरामन खोसकर हया राष्ट्रवादी काँग्रेसचे पदरात पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचे नाव सर्वाथिक चर्चेत व आघाडीवर होते.मात्र त्यांना अचानकपणे आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन खुश करण्यात आले आहे. ईगतपुरी तालुक्यातील एखादया नेत्यास एवढया मोठया पदावर काम करणेची प्रथमच संधी मिळत आहे.यामुळे ईगतपुरी सह त्रंयबकेश्वर तालुक्यातील शिवसैनिकानीं जल्लोष केला आहे.
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे आभार मानत या पदाच्या माध्यमातुन आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास महामंडळाचे नवननिवार्चित अध्यक्ष ना.काशिनाथ मेंगाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानां दिली आहे.

