भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची आई गंगुबाई जोरगेवार “अम्मा” यांचे त्यांचे राहते घरी राजमाता निवास, कोतवाली वॉर्ड, चंद्रपूर येथे रविवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.15 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची ओळख म्हणजे चंद्रपुरात अम्माचा टिफिन नावाने अत्यंत गरजू लोकांना अन्नदान करण्याचे काम आ. किशोर जोरदार यांनी सुरू केले. मुलगा आमदार झाला म्हणून त्यांनी आपला पिढी जात व्यवसाय सुरूच ठेवला होता. कुठलाही गर्व न करता त्या शेवटपर्यंत महानगरपालिकेच्या सात मजली बिल्डिंग समोर आपला टोपल्या विकण्याचा व्यवसाय करीत होत्या. आज त्या या जगात नसल्या तरी, त्यांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार फार मोठे आहेत. त्यांच्या मागे दोन मुले मुलगी आणि भरभरून नातवंड असा फार मोठा जोरगेवार कुटुंब असून त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो.
त्यांची अंत्यविधी उद्या दिनांक. 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.00 वा. राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून दस्तगिर दर्गःह, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गे अंतिम यात्रा निघून शांतिधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे.

