ईगतपुरी विधानसभा मतदारसंघात वार्तापत्र
ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणुक निकालाचा इतिहास बघितला तर हा मतदारसंघ नेहमी उलटया दिशेने कौल देतो. अपवाद वगळता या मतदारसंघाने नेहमीच सत्ताधार्यानां साथ देण्याऐवजी विरोधी बाकावर बसण्यासाठीच आमदार पाठवला आहे. हे एक गंमतीदार असे या मतदारसंघाचे वैशिष्टये आहे.
महाराष्ट्रात जेव्हा कॉंग्रेस पक्ष प्रबळ मानला जात होता, तेव्हाही या मतदारसंघाने कम्युनिष्ठ पक्षाला साथ दिली होती.त्यानंतर कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असतानां शरद पवार यांच्या पुलोद आघाडीस व नंतर भाजपास या मतदारसंघाने साथ दिली होती.
सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस ची सत्ता आली असतानां या मतदारसंघाने काशिनाथ मेंगाळ यांचे रुपाने भाजप शिवसेना युतीला कौल दिला.तर सन २०१४ चे निवडणुकीत भाजप शिवसेना युतीची लाट असतानांही या मतदारसंघाने कॉंग्रेस पक्षाच्या सौ.निर्मला गावित यांना साथ देत विरोधी बाकावर बसावयास लावले.
सन २०१९ चे निवडणुकीत ही राज्यात मोदी लाट असतानांही या मतदारसंघाने मात्र कॉंग्रेस पक्षाच्या हिरामन खोसकर यांना साथ दिली. अर्थात राज्यात निकालानंतर नाटयमय घडामोडी घडत भाजप व शिवसेना युती तुटुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी भलतीच आघाडी तयार होऊन ती सत्तेवर आली. त्यामुळे ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाने विरोधी बाकावर बसायचा जनादेश देऊनही हिरामन खोसकर हे सुदैवी ठरले व सत्ताधारी बाकावर बसण्याचा योग त्यांना आला.पण अखेर पुढील अडिच वर्षातच हे आघाडी सरकार कोसळल्याने आमदार हिरामन खोसकर यांना पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागले.
अर्थात सन १९९५ मध्ये कॉंग्रेस पक्षाचे शिवराम झोले, सन १९९९ मध्ये पांडुरंग गांगड व सन २००९ मध्ये सौ.निर्मला गावित हयांच्या नशिबी सत्ताधारी बाकावर बसण्याचा योग मतदारानीं जुळवुन आणला होता.
या नतदारसंघाने सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही देशभर मोदीचीं लाट असतानांही राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांना मताधिक्क्य दिले होते तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ही शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना निवडुन देत विरोधी कौल दिला आहे.
एकुणच ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा विरोधी पक्षास नेहमी धार्जिणा मानलो जातो.हा अकुण इतिहास आहे.
यंदा निधानसभा निवडणुक निकालात हा मतदारसंघ कोणास कौल देतो हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.यंदाची निवडणुक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये होणार आहे.त्यामुळे ईगतपुरी त्रंयबकेश्वर कर सत्तेच्या बाजुने कि विरोधी बाजुचा कौल देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

