लुंबिनी बुद्ध विहारात वर्षवास ग्रंथ समाप्ती समारोह सोहळा व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सांगता समारोह कार्यक्रम संपन्न

0
122

ओझर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – लुंबिनी बुध्द विहार विकास ट्रस्ट टाऊनशिप ओझर सलाबादा प्रमाणे वर्षवास ग्रंथ समाप्ती समारोह सोहळा व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सांगता समारोह करण्यात आला.
बौद्धाचार्य मा.माधव शेजवळ, मा. वैशाली मिलिंद जाधव, मा. दिगंबर वाघ, मा. शिरीष जाधव, यांच्या उपस्थितीत लुंबीनी बुध्द विहार ओझर टाऊनशिप येते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बौध्द उपासिका मा.माधुरी रविंद्रदादा जाधव या उपस्थित होत्या.
सर्वात प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरी यांच्या हातून लुंबीणी बुध्द विहारात पंचशीलाचा ध्वज फडकवण्यात आला आणि भगवान गौतमबुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्प हार अर्पण करून करण्यात आले.
बुद्ध वंदना पंचशील त्रिशरण घेऊन करण्यात आली व धम्म देसना, मा. वैशाली मिलिंद जाधव व माधव शेजवळ यांनी दिली. तसेच लोकनेते रविंद्र जाधव यांच्या प्रतिमेस हार पुष्प वाहून दादांच्या स्मृतींना अभिवादन केले.
जेष्ठ नेते मा.वसंतराव वाघ (मामा) आणि संजयबाबा गायकवाड यांनी उजाळा देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेल्या मा. माधुरी रविंद्र जाधव यांचा सत्कार शाल गुच्छ देऊन शालिनी गवई, संगीता पवार, आशा जाधव, शिला जाधव, वनिता जाधव, यांनी केला.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर जेष्ठ नेते मा. वसंत वाघ, मा.संजय गायकवाड, मा.विनोद जाधव, मा.जितु जाधव, मा.संदीप जाधव, डॉ.नेहा रविंद्र जाधव, एम आर मानाशेठ, मा.सुरेश डांगळे, मा. संतोष सोनवणे, मा.दौलत घोडके, मा. धर्मा जाधव, मा.उत्तम जाधव, चार्वाक जाधव, अमोल गवई,राजेंद्र जाधव यांनी कार्यक्रमास प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक मा. भारत गवई व सहपरिवार यांनी पुष्प देऊन केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. दिगंबर वाघ, मा. भारत गवई यांनी केले. तर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार संगीता पवार यांनी मानले शेवटी सरनते गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि लुंबीनीबुध्द विहार विकास ट्रस्टच्या वतीने लोक वर्गणीतून अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले विनोद वानखेडे, अनिल वाघ, कैलास इंगळे, बाबुराव प्रधान,संदीप साबळे,आप्पा खरात, केदु अण्णा त्रिभुवन, संदीप चव्हाण, राजू भुतेकर, नानासाहेब खरात हरिभाऊ खरात,सुधाकर गायकवाड, उत्तम बनसोडे,राजेंद्र गांगुर्डे,व असंख्य महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र जाधव, सांची जाधव, किशोर गवई, अमोल गवई, दीपक गवई, समाधान गवई,सहदेव गवई,नरेश गवई, विजय गवई, विद्या गवई, ममता गवई, शुभांगी गवई, शितल गवई, कलावती गवई यांनी परिश्रम घेतले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here