आभाळ भरून आलं
वाटलं येईल मोठा पाऊस
आला खरंच धो धो
फेडली सगळ्यांची हौस
कुणाची भिजली बॅग
कुणी पडलं सरकुन
कुणाची मोडली छत्री
कुणी गेलं हरकुन
पावसाने भिजवले
कोणाचे घर आणि अंगण
तर ओढ्याच्या पाण्यात
झाले गोल रिंगण.
पावसाने केली सगळ्यांची फजिती
पुरात संसार गेले वाहून
झाडावरची चिमणी पाखरं
बसली बाळांना घेऊन.
सुर्य बसला जाऊन
ढगांच्या आड
त्याला दिसेना रस्ता धड
अंधारुन आले जग सारे
थंडगार सुटले खारे वारे
इंद्रधनुने तर कमालच केली
सप्तरंगाची उधळण झाली
लालेलाल आभाळात दिसते लाली
जणु सुवासिन मळवट ल्याली
सौ. सुनंदा वाळुंज
ठाणे

