शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशीम : वाशिम जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक कलावंताना,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेंतर्गत दरमहा मानधन मिळावे.या मागणीसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक असलेल्या लोककलावंत आणि ज्येष्ठ झुंजार पत्रकार संजय कडोळे यांचे नेतृत्वात विदर्भ लोककलावंत संघटनेच्या हजारो वृद्ध कलावंतानी दि. 24 जानेवारी 2024 रोजी विराट असे धरणे आंदोलन केले होते व त्याची दखल घेऊन आणि शासन आदेशानुसार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी शासकिय अधिकाऱ्यांची जिल्हा निवड समिती स्थापन करून दि. 04 ते 10 मार्च 2024 पर्यंत सामाजिक न्याय भवन वाशिम येथे वृद्ध कलावंताच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण घेऊन 241 कलावंताची मानधन लाभार्थी म्हणून निवड करून,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम मार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय विस्तारभवन मुंबई 32 यांचेकडे पाठवलेली होती.
त्यामधील काही वृद्ध कलावंताना गेल्या पाच महिन्याचे प्रत्येकी 25000 रु रक्कम पाठविण्यात आली.परंतु अद्यापही जिल्ह्यातील अनेक कलावंत मानधनाच्या लाभापासून वंचित असल्यामुळे, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा द्वारे शुक्रवार दि. 25 ऑक्टोंबर 2024 रोजी वाशिम येथे दुपारी 01:00 वाजता, मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी वाशीम यांना निवेदन देऊन दिपावली पूर्वी लाभार्थ्याच्या खात्यात मानधन रक्कम देण्याची मागणी करण्यात येणार आहे.तरी ज्या वृद्ध कलावंताना अद्याप पर्यंत मानधनाची रक्कम मिळालेली नाही अशा सर्व कलावंतानी आपल्या आधार कार्ड व बँक पासबुकाच्या झेरॉक्ससह आपआपले विनंतीअर्ज घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने वृद्ध कलावंताना करण्यात आले आहे.

