आप ने दिवे लावून ब्रिज वर टाकला प्रकाश
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर बाबुपेठ मधील कित्येक वर्षांनी अनेक अडथडेपर करीत बनलेला चर्चित रेल्वे उडान पूल ज्याची येथील जनतेला आतुरतेने वाट होती त्या ब्रिजचे उद्घाटन पंधरा दिवसापूर्वी येथील आमदार तथा भाजपा नेत्याने केले होते
परंतु उदघाटन झाले तेव्हा पासून या ब्रिज वरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने जनतेला जीवघेना प्रवास करावा लागतो आहे. अंधारामुळे रोज अपघाताच्या घटना सुद्दा घडत आहेत. याबाबत जनतेची तक्रार आप चे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे आल्याने त्यांनी संबंधित मनपाचे अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी बांधकाम विभाग यांनी आपल्याकडे चार्ज दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता तक्रार तरी करायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झाल्याने. उदघाटनाची चमकोगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासना विरोधात डॉ. आंबेडकर ब्रिज वर दिवे आणि मेणबत्ती लावून निषेध नोंदविला आणि प्रशासनाला अल्टीमेटम देण्यात आला कि येत्या सात दिवसात पुलाचा अंधःकार दूर केला नाही तर बाबुपेठ येथील जनतेला सोबत घेऊन पुलावर चक्का जाम आंदोलन करू जेणेकरून लोकांचे जीव वाचतील.
यावेळेस आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष जावेद सय्यद, संघटनमंत्री मनीष राऊत, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, वाहतूक शहर अध्यक्ष जयदेव देवगडे, सुधीर जांभूळकर, युवा जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, युवा कार्यकर्ता सागर बोबडे, अजय बाथव, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत रामटेके, तसेच वॉर्डातील अनेक नागरिकांचा समावेश होता.

