prabodhini news logo
Home ठळक बातम्या महायुती हे बहुजनांचे शोषण करणारे मनुवादी सरकार – विजय वडेट्टीवार

महायुती हे बहुजनांचे शोषण करणारे मनुवादी सरकार – विजय वडेट्टीवार

0
162

राज्यात इडी, सीबीआय च्या बळावर महायुतीची सरकार – अभिजित वंजारी

गुंजेवाही, वासेरा, नवरगाव प्रचार सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करतं भाजपने पक्ष फोडीचे निच राजकरण केले. जनावरांच्या खरेदी – विक्री प्रमाणे खोके देऊन आमदार विकत घेत भ्रष्ट महायुती सरकार स्थापन केली.यांच्या काळात देशात व राज्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली , अनेक भ्रष्टाचार झाले.कवडीमोल भावाने राज्याची संपत्ती व्यापाऱ्यांना विकून कमिशन खोरीतून नफा कमाविनाऱ्या अशा लुटारूंचा सहभाग असलेल्या महायुती सरकारने आपल्या मानगुटीवर बसून संपुर्ण राज्याचे वाटोळे केले. हे मनुवादी विचारांचे महायुती सरकार बहुजनांना आपसात लढवून त्यांचे शोषण करणारे सरकार आहे.या महापापिंना सत्तेतून पायउतार करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही तालुक्यांतील गुंजेवाही, वासेरा, नवरगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना बोलले.

आयोजित सभेस सिंदेवाही काँग्रेस जेष्ठ नेते चंद्रशेखर चन्ने, युवक काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, विरेंद्र जयस्वाल, बाबुराव गेडाम, राहुल पोरेडीवार, संजय पुपरेड्डीवार, सीमा साहारे, आशा गंडाटे, हरिभाऊ बारेकर, प्रमोद बोरीकर,दादाजी चौके, परशुराम बोरकर, राहुल बोडने, सुशांत बोडणे, व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही केवळ राज्याची निवडणूक नसून दोन विचारांची लढाई आहे. या लढाईत एकीकडे संविधान परिवार तर दुसरीकडे मनुस्मृती जपणारा संघ परिवार आहे. या संघ परिवाराने सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम करण्या हेतू संविधान बदलविण्यासाठी षडयंत्र रचले असून देशातील सर्वसामान्य जनतेचा हक्क साबूत ठेवणारा महान ग्रंथ संविधानाला वाचवण्याची जबाबदारी आता तुमची आणि आमची आहे. असेही ते म्हणाले.तर भाजपवाल्यांनी या क्षेत्राचा कुठलाही विकास केला नाही आणि आता उलट्या बोंबा मारत असून खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवीत असल्याची तसेच लाडक्या बहिणींना धमकविण्याचेही काम भाजपकडून सुरू असल्याची टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केली. कोरोना काळात कुटुंब प्रमुख या नात्याने जबाबदारी खांद्यावर घेऊन परराज्यात अडकलेल्या लोकांना सुखरूप पोहोचविले. गोसेखुर्द धरणातून पाणी पोहोचवून शेतकऱ्यांची अडचण दूर केली. कॅन्सल कृष्ण रुग्णांना आधार देऊन त्यांचे प्राण वाचविले तर मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटपातून 50 हजार नागरिकांना दृष्टी दिली. मी नेहमी मानव सेवेचा धर्म पाळून जनतेच्या पाठीशी सदैव उभा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
तर ईडी, सीबीआय, च्या बळावर सत्तेत आलेलं या खोके सरकारने देश व राज्य लुटून आपली अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली. व व्यापाऱ्यांची तिजोरी भरली.सर्व सामान्य जनतेला आता प्रचंड महागाई व बेरोजगारीची झळा सोसावी लागत असून या खोके बाजांना धडा शिकवा असे आवाहन पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा जनतेपुढे वाचला. आयोजित कार्यक्रमास बहुसंख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here