prabodhini news logo
Home ठळक बातम्या नाट्यश्री कविता स्पर्धेतील छेचाळीसाव्या सत्रात लता शिशुपाल शेंद्रे विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील छेचाळीसाव्या सत्रात लता शिशुपाल शेंद्रे विजयी

0
121

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे छेचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३३ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवयित्री लता शिशुपाल शेंद्रे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “वर्षावास” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
लता शिशुपाल शेंद्रे हे गडचिरोली येथील नवोदित कवयित्री असून अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी दिडशेच्या वर कवितांचे लेखन केले आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भ फुलत आहे’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या छेचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, राजेंद्र यादवराव सोनटक्के, रोहिणी अमोल पराडकर, सोनाली रायपुरे- सहारे, राजरत्न पेटकर, उकंडराव नारायण राऊत, रेखा दिक्षित, यामिनी मडावी, पुनाजी कोटरंगे, पी. डी. काटकर, संगिता ठलाल, शैला चिमड्यालवार, सुनील चडगुलवार, चरणदास वैरागडे, मुर्लीधर खोटेले, जयराम धोंगडे, लता शेंद्रे, वंदना सोरते, ज्योत्स्ना बंसोड, पुरुषोत्तम दहिकर,मधुकर दुफारे, वामनदादा गेडाम, ज्योती म्हस्के, संतोष कपाले, संगीता रामटेके,वंदना मडावी, प्रिती ईश्वर चहांदे, सुभाष धाराशिवकर, सुजाता अवचट, खुशाल म्हशाखेत्री,डॉ. मंदा पडवेकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here