prabodhini news logo
Home चंद्रपूर इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे शालेय गणवेश वितरण आणि सेफ टच व...

इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे शालेय गणवेश वितरण आणि सेफ टच व अनसेफ टच यावर मार्गदर्शन

0
83

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पठाणपूरा येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरित करण्यात आले. यावेळी मुलांना सेफ टच आणि अनसेफ टच याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा सुचिता जेऊरकर आणि सचिव पल्लवी तेलंग उपस्थित होत्या.

कार्यक्रमात माजी अध्यक्षा राखी बोराडे आणि ममता दादुरवाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. क्लबच्या सदस्या किरण आवळे आणि स्नेहा जैन यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठे योगदान दिले. शालेय गणवेशाचा संपूर्ण खर्च स्नेहा जननी यांनी प्रायोजित केला, ज्यामुळे त्यांच्या उदार मनाचा परिचय झाला.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर त्यांचे हक्क आणि सुरक्षा यांविषयी जागरूक करणे हा होता. क्लबने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here