पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 2 डिसेंबर 2024 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामतुकूम येथे सामाजिक न्याय विशेष सहाय्यक शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. समतादूत प्रकल्प तालुका पोंभुर्णा व समाज कल्याण चंद्रपूर यांच्यावतीने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त संविधान अमृत महोत्सव 2024 – 25 घर घर संविधान अभियान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे संविधान प्रास्ताविक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मोरेश्वर वाकडे समतादूत पोंभुर्णा, अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. डी. डी. कोतंमवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. डि. वानखडे यांनी केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संजीव कस्तुरे वर्ग चौथा, द्वितीय क्रमांक दिव्या परचाके वर्ग सातवा, तृतीय क्रमांक राधिका गद्देकार वर्ग सहावा, प्रोत्साहन पर बक्षीस मेघनाथ पिपरे वर्ग पाचवा. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन कु. एस साकरकार मॅडम यांनी केले.
आभार प्रदर्शन कु. एस बी कोहडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

