वाई (बा) येथे कलाल गौड समाजाचा वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन

0
51

किनवट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कलाल गौड समाजाचा वर-वधू परिचय मेळावा वाई येथे ८ डिसेंबर रोजी आयोजित केला असून या परिचय मेळाव्यास समाजातील सर्व घटकांनी येण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
समाजामधील समस्या आणि वर्तमान काळातील मार्गक्रमण कसे करावे यावर मंथन करण्यात येणार आहे. मेळाव्याचे अध्यक्ष नितीन कन्नलवार असून स्वागताध्यक्ष म्हणून किनवट तालुका कलाल संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय कन्नलवार आहेत. सदरील मेळाव्याचा फायदा सर्व समाजातील घटकांनी घेऊन येणाऱ्या काळात किनवट येथे होणाऱ्या विवाह मेळाव्यास आपण सर्वांनी तन-मन-धनाने उपस्थित राहून इतर समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन विजय कन्नलवार व नितीन कन्नलवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here