कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कोल्हापूर येथे थानपीर माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्यावतीने 5 डिसेंबर 1971 च्या युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, पंचशील करण्यात आला.
थानपीर योद्धा तसेच वीर शहिदांच्या परिवारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी थानपीर युद्धाचे अनुभव सांगण्यात आले.
महार गाणं तसेच राष्ट्रगीत म्हणण्यात आले. तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीकांत नडगीरसो, बापू घाटगेसो, गोपाल कांबळेसो, अशोक बनसोडे, यांचा सत्कार करण्यात आला. युद्धामध्ये शहीद झालेले परिवार कै. आनंदा मोरे, व कै.विजेंद्र साबळे परिवारांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्यक्ष अनुभव युद्धात घेतलेल्या जवानांनी अनुभव सांगितला. 5 दिवस अन्न ,पाणी ,शिवाय 13 महार रेजिमेंट यांनी पाकिस्तानबरोबर लढा दिला होता.
सिग्नल झाला. आला रे आला महार आला. अशा घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात फायरिंग झाली. 1966 यावर्षी 13 महार रेजिमेंट ची स्थापना झाली. या युद्धामध्ये 32 जवान शहीद झाले होते. महार रेजिमेंटला दोन अवॉर्ड देण्यात आले. 5 डिसेंबर 1971 हा थानपीर विजय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये संगीत खुर्ची, बलून, कार्यक्रम घेऊन सांगता झाली. या कार्यक्रमाला कोल्हापूर,सांगली, सातारा, या जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक ,परिवार उपस्थिती होता.
आयोजन, रमेश निर्मळे, सुधिर सरजामे, तुकाराम कांबळे, सुहास कांबळे, संदीप कांबळे, भीमराव बारामतीकर ,अशोक पवार ,शिवाजी धनवडे व थानपीर यूनिटचे सर्व माजी सैनिक यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

