जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

0
23

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.10: मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांचे मध्यस्थी कृती आराखडा सन 2024-2025 नुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे रामान-किमान कार्यक्रम माहे डिसेंबर-2024 नुसार मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम व विधी स्वयंसेवक/स्वयंसेविका यांचे मुलभूत कायदा / विधीस्वयंसेक/स्वयंसेविका यांचे कार्य आणि कर्तव्य या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता विधी सेवा सदन इमारतीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून वसंत कुलकर्णी, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून किशोर आखाडे, अध्यक्ष, जिल्हा अधिवक्ता संघ, गडचिरोली हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी विधी स्वयंसेवक / स्वयंसेविका यांना मुलभूत कायदा समजावून सांगितला तसेच समाजातील तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवितांना विधी स्वयंसेवक/स्वयंसेविका यांनी त्यांचे कार्य आणि कर्तव्ये लक्षात घेवून जनसामान्यांचे समस्याचे कशाप्रकारे निराकरण करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून वसंत भा. कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी उपस्थितांना आपसातील वाद सामंजस्याने कसे मिटवता येतील, मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षांना कसे समाधान प्राप्त होते, मध्यस्थीमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा याची बचत कशाप्रकारे होते याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास विविध बँक, पतसंस्था, विविध विभागाचे पदाधिकारी, न्यायालयातील पक्षकार, विधी स्वयंसेवक / स्वयंसेविका तसेच अधिवक्ता वृंद बहुसंख्येने सहभागी होते. कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन व आभार जे. एम. भोयर, कनिष्ठ लिपीक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली चे सर्व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here