प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली च्या वतीने निरनिराळे साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून यंदा पहिल्यांदाच महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य स्पर्धेत ३०० साहित्यिकांनी सहभाग नोंदविला असून विविध विषयांवरील ३४५ ग्रंथ प्राप्त झाले.
या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून त्यात परिक्षकांनी विविध प्रकारच्या ३६ साहित्याची निवड केली आहे. त्यात कादंबरी विभाग – प्रथम – डॉ.राजश्री पाटील, कोल्हापूर -(… आणि चांदणे उन्हात हसले), द्वितीय – डॉ. स्मिता दातार, गोरेगाव,(अयोध्येची उर्मिला), तृतीय- अशोक कुबडे, नांदेड (गोंडर), कथासंग्रह विभाग – प्रथम – शुभांगी मांडे- खारकर, पुणे (बेघर), द्वितीय -डॉ. प्रतिभा जाधव,नाशिक (दहा महिण्याचा संसार), तृतीय- दीपक तांबोळी,जळगाव (वाटणी), वर्षा किडे – कुलकर्णी, नागपूर (ट्रोलधाड), योगिराज वाघमारे, सोलापूर (चौरंग), सर्वोत्कृष्ट – प्रमोद बोरसरे (पाचोळा), कविता विभाग – प्रथम – डॉ. ललीत अधाने, छ. संभाजीनगर (माही गोधडी छप्पन भोकी), द्वितीय – गीतेश गजानन शिंदे, ठाणे (सीसीटीव्हीच्या गर्द छायेत), तृतीय- नोमेश नारायण, ब्रम्हपुरी (रक्त फुलांचे ताटवे), सौ.जयश्री कुलकर्णी – अंबासकर, नागपूर (चिंब सुखाचे तळे), प्रा. सुनंदा पाटील, ठाणे (सावली अंबराची), पंडित कांबळे (पेटलेल्या शहराच्या कल्लोळात), डॉ. शिवाजी नारायण शिंदे, सोलापूर (अंतस्थ हुंकार), पी. डी. काटकर, नागभिड (कळा या लागल्या जीवा), बळवंत भोयर,नागपूर(स्वेदरंग), आत्मकथन विभाग – प्रथम – प्रा. लालासाहेब जाधव, ठाणे (परका), द्वितीय – प्रा. प्रमोद नारायणे, वर्धा (मी पॉझिटिव्ह आलो), तृतीय – पोपट श्रीराम काळे, पुणे (काजवा), ललीतलेख विभाग – प्रथम – प्रा. निर्मोही फडके, ठाणे (अनहद), द्वितीय – यतीन सामंत, बंगळुरू (कॅलिडोस्कोप), तृतीय – प्रा. सचीन सावरकर, वर्धा (आयुष्याचा मृद्गंध), प्रा. मोहन खडसे, अकोला (कवडसा), बालसाहित्य विभाग – प्रथम – रश्मी गुजराथी, पुणे(आनंदाच्या बिया), नाटक विभाग- प्रथम – प्रा. विद्यासागर अध्यापक, कोल्हापूर (ऱ्हासपर्व), द्वितीय – प्रा. डॉ. एम. डी. इंगोले, परभणी (धरती आबा बिरसा मुंडा), संपादन विभाग – प्रथम – डॉ. प्राचार्य श्याम मोहरकर, चंद्रपूर(नव्वदोत्तरी झाडीपट्टी रंगभुमी -चिंतन आणि चिकीत्सा),द्वितीय -प्रा. डॉ. रमेश माने, अंमळनेर (संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज), समीक्षा विभाग- प्रथम – प्रा. अनंता सूर, वणी (साहित्य समीक्षा: शोध आणि बोध), द्वितीय – प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे (स्त्रीवाद आणि साहित्यातील स्त्री), संकिर्ण विभाग- प्रथम – प्रभाकर तांबट, कोल्हापूर (कलापूरचे सूरसाधक), द्वितीय – नितीन आनंदाचे, बेळगाव (कर्नाटक) – माझी चारधाम यात्रा, तृतीय- वैशाली खाडिलकर,मुंबई (आरोग्यम धनसंपदा), वसंत चन्ने, नागपूर (मुलारंभ) इ. साहित्याचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १५ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून १५ डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

