भंगाराम तळोधीत साकारणार १४९.७७ लक्ष रुपयांचे सुसज्ज वाचनालय

0
53

आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांचे फलित.

गोंडपिपरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १२
तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे सुसज्ज अशा वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंर्गत १४९.७७ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या यशस्वी प्रयत्नांनी भंगाराम तळोधीत सुसज्ज अशा वाचनालयाच्या निर्मीतीमुळे परीसरातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने चांगला फायदा होणार आहे.

या वाचनालयाच्या बांधकामाकरीता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचे भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, माजी जि. प. सदस्या वैष्णवी बोडलावार, सरपंचा लक्ष्मी बालूगवार, उपसरपंच सूनिल घाबर्डे स्वाती वडपल्लीवार, तालुका महामंत्री निलेश पुलगमकर, राकेश पुण, माजी सरपंच मारोती अम्मावार, भानेश येग्गेवार, विजय पेरकावार, संजना अम्मावार, संजय गोविंदवार, मारोती आदे, नितीन कोल्हापूरे, देवराव चौधरी, मधुकर गूरनूले, राकेश कटकमवार, संजय रामगोनवार, सूनिल रामगोनवार, संजय गूडमेट्लावार, समीर माडूरवार, संस्कार बोडलावार,अजित कूद्रपवार, अर्चना कावळे, नम्रता बारसागडे, गीताताई बूर्रीवार, सूनंदाताई चांदेकर, मनोज सिडाम, संगिताताई अम्मावार, गोपीनाथ शेरकी, मारोती कावटवार, शंकर मराठे आदिंनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here