माझी जिवलग मैत्रीण म्हणून
तू माझ्या हृदयात कायमची अस्तित्वात आहेस
आयुष्यात वेळ कशीही असू दे
तूच माझ्या सोबत आहे…..1
तू जवळ नसतानाही
तू सतत जवळ असतेस
मनातल्या प्रश्नांचा गुंत्ता
अलगत तू सोडवत असतेस…2
तुला भेटण्याची ओढ
कायम हृदयात माझ्या आहे
एकदा फक्त सांगून बघ
तुझ्याच नजरे समोर मी आहे…..3
कवी मनाची कल्पना तू
लावण्यवती ललना तू
माझ्या प्रत्येक शब्दात तू
या कवितेची कवयित्री तू……4
कवयित्री सौ.वैजयंती विकास गहुकर
योगा टीचर जिल्हा.चंद्रपूर

