prabodhini news logo
Home गडचिरोली देसाईगंज येथील दुर्मिळ जखमी घुबडाला आप तालुका अध्यक्षांनी दिले जीवदान

देसाईगंज येथील दुर्मिळ जखमी घुबडाला आप तालुका अध्यक्षांनी दिले जीवदान

0
139

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील वैनगंगा नदीच्या पुलावर काल रात्री १० वाजता दुर्मिळ प्रजातीचे घुबड आढळून आले. सुमारे २.३ किलो वजनाचे घुबड नदीच्या पुलावर जखमी अवस्थेत कुरतडत असताना दुर्मिळ प्रजातीचा पक्षी जखमी अवस्थेत दिसला, तेव्हा आम आदमी पार्टीचे तालुकाप्रमुख भरत दयलानी व त्यांचे मित्र परवेज पठाण यांच्यासमवेत घेऊन आले. जखमी घुबड रात्रीचे 10 वाजले होते, त्यामुळे वनविभागाचे कार्यालय बंद होते. घुबडाचा एक पंख पूर्णपणे जखमी झाला होता.
रात्रीचे 10 वाजले होते त्यामुळे वनविभागाचे कार्यालय बंद असल्याने वनविभागाचे धांडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांना सकाळी घेऊन येण्यास सांगण्यात आले घुबडाचा एक पंख पूर्णपणे जखमी झाला होता.
घुबडाला उडता येत नसल्याने आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत दयलानी मित्र परवेज पठाण व जावेद कुरेशी यांनी हे घुबड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here