शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कारंजा (लाड) : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित असलेल्या पहिल्या स्थानिक महिला आमदार श्रीमती सईताई प्रकाशराव डहाके ह्या शुक्रवारी दि.13 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजे पासून, मानोरा येथील शासकिय विश्रामगृह मानोरा येथे उपस्थित राहणार असून यावेळी त्या मानोरा तालुक्यातील मतदार राजाच्या भेटी गाठी घेऊन निवडणूकीत जनतेने दिलेल्या अधिकाधिक मताधिक्याने विजयी कौल दिल्या बद्दल मतदारांचे आभार व्यक्त करतील.शिवाय मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वृत्त मिळाले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे. तरी मानोरा तालुक्यातील ग्रामस्थांनी आ.सईताई डहाके यांच्या भेटीकरीता आवर्जून उपस्थित राहावे.

