मोसम येथे केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलन प्रारंभ

0
162

अहेरी प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार :- अहेरी तालुक्यातील स्थानिक पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोसम येते केंद्रस्तरीय बाल क्रीडा व स्पर्धा सांस्कृतिक संमेलनाचे उद्धाटन आज गुरुवारी करण्यात आले .
आलापल्ली केंद्रा अंतर्गत 14 गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येत असून विद्यार्थी व शिक्षक वर्ग 12 ते 13 डिसेंबर दरम्यान खो-खो, कबड्डी, सांस्कृतिक कार्यक्रम मोसम येथे केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन मध्ये आयोजित करण्यात आले आहे.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उद्घाटक देवलमरी ग्रामपंचायत चे सरपंच लक्ष्मण कन्नाके, कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, विशेष अतिथी मेडपली ग्रा.प सरपंच निलेश वेलादी, आलापल्ली ग्रा.प उपसरपंच विनोद अकनपल्लीवार, देवलमरी ग्रा.प उपसरपंच हरीश गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ मडावी, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार , प्रमुख पाहुणे म्हणून नागेपली ग्रा.प सदस्य राकेश कुळमेथे, बाबुराव वेलादी, लालु आलाम प्रतिष्ठात नागरिक मोसम, संगिता मेश्राम आरोग्य सेविका मोसम, पत्रकार तिरुमलेश कंबलवार मोसम, मुख्य अतिथी म्हणून आलापल्ली चे केंद्रप्रमुख जी.पी.मडावी, अध्यक्ष संजय येलमवार , सचिव तिम्मा सर, क्रीडा प्रमुख अजय सोनलकर, कोषाध्यक्ष सोयाम मॅडम मोसम, सुत्रसंचलन मुकुंद सडमेक सह शिक्षक, आरती गेडाम कन्या शाळा आलापल्ली, समस्त सर्व पदाधिकारी, ग्रा.प. पदाधिकारी, महिला बचत गट, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच सर्व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here