करंजमहात्म्य परिवाराचे अनुमान खरे ठरणार
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा : पंधरा दिवसांपूर्वी कारंजाच्या सा. करंजमहात्म्य परिवाराचे मुख्य कार्यवाह तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मिळालेल्या विश्वसनिय माहितीवरून,पुसदचे आमदार इंद्रनिल मनोहर नाईक यांचा लवकरच महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात प्रवेश होणार असल्याच्या बातम्या प्रकाशीत करून लवकरच वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ आमदार इंद्रनिल मनोहर नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याचे भाकित करून एकच खळबळ उडून दिली होती. त्यांचे भाकित लवकरच खरे ठरणार असल्याची शक्यता असून, एक ते दोन दिवसात होऊ घातलेल्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या निवडक आमदारांमधून,बंजारा समाजाचे भूषण असणाऱ्या लोकप्रिय नाईक घराण्याचे वंशज पुसदचे तरुण,तडफदार आमदार इंद्रनिल मनोहर नाईक यांचीच वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनिय वृत्त असून त्यांच्या नियुक्तीला दिल्लीश्वरांकडून हिरवी झेंडी मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात प्रवेश झाल्यास हमखासपणे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याचे विश्वसनिय वृत्त आमच्या करंजमहात्म्य परिवाराच्या मुंबई आणि पुसद यवतमाळच्या प्रतिनिधीकडून कळविण्यात आले आहे.आ.इंद्रनिल मनोहर नाईक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठित व नावलौकिक प्राप्त असलेल्या नाईक घराण्याचे वंशज असल्यामुळे निश्चितपणे त्यांच्या कारकिर्दीत,परमपूज्य सेवालाल महाराजांची पवित्र पुण्यभूमी आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या जिल्ह्याचा म्हणजेच वाशिम जिल्ह्याचा सर्वोतोपरी विकास होईल अशी अपेक्षा कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अनासाने,प्रदिप वानखडे, लोमेश पाटील चौधरी, लक्ष्मणराव इंगळे,अजाब महाराज ढळे,कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे, देवकाबाई इंगोले आदींनी व्यक्त केली आहे.तसेच लवकरच मंत्रीमंडळात होणाऱ्या प्रवेशामुळे त्यांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी उत्सुक असल्याचे कळवीले आहे.

