उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व नायब तहसीलदार भोसले यांना निवेदन
बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर – आज दि.(१७) रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी आज उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व नायब तहसिलदार भोसले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले..
उदगीर तालुक्यातील शिक्षण व आरोग्य आस्थापना मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांनी आज विविध मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व नायब तहसीलदार भोसले यांना प्रशिक्षणार्थ्यांना वेळेवर मानधन देण्यात यावे,मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी,सहा महिन्याचा कालावधी असून हा 11 महिन्याचा कालावधी करण्यात यावा,प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती करून घेण्यात यावे.तसेच मुख्यमंत्री व कौशल्य विकास मंत्री यांनी दिलेले आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी,काही प्रशिक्षणार्थ्यांचे जवळपास चार महिने झाले अशांना आणखी मानधन जमा झाले नाही काहींचे झाले ते एक दोन महिन्याचे झाले त्यांना त्वरित महिना संपल्यानंतर ५ ते१० तारखेपर्यंत मानधन देण्यात यावे.अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष बळीराम लांडगे,उपाध्यक्ष अनिल भोसले,सचिव भरत हुले,कोषाध्यक्ष विद्यासागर मुंढे,सहसचिव ज्ञानोबा जाधव व सदस्य तसेच तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

