शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेस्काॅम ४४व्या वर्धापनदिनी दिनांक १३/१२/२४रोजी जेष्ठ नागरिक भवन नेरूळ नवी मुंबई येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेस्काॅम तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक प्रादेशिक विभागातून उत्कृष्ट जेष्ठ नागरिक संघ, उत्कृष्ट महिला कार्यकर्ता, उत्कृष्ट पुरुष कार्यकर्ता प्रत्येकी एक याप्रमाणे निवड केली जाते..
यावेळी पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग अर्थात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट संघ शिर्ला, ता. पातूर तर उत्कृष्ट महिला कार्यकर्ता म्हणून ॲड मंगला माणिकराव नागरे, सचिव जेष्ठ महिला नागरिक संघ, कारंजा यांची निवड करण्यात आली होती.
पुरस्कार वितरण सोहळा आदरणीय आमदार गणेश नाईक, नवी मुंबई यांच्या हस्ते पार पडला. व्यासपीठावर अखिल भारतीय जेष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी ,महाराष्ट्र फेस्काॅम पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जेष्ठांनी खूप सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत बहुसंख्य उपस्थितांचे मनोरंजन केले..संपूर्ण कार्यक्रम अतिशय देखणा , दर्जेदार व उत्साहात संपन्न झाला.

