नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नाशिक रोड गेले पाच वर्ष हॉस्पिटल सुरू झालं आहे त्या ठिकाणी दिव्यांगांना मार्गदर्शन करणारी फरशी लावलेली नव्हती त्यासाठी दिपक सरोदे यांनी गेली दीड वर्षापासून विनंती अर्ज तक्रार व स्मरण पत्र पाठपुरावा करून वैद्यकीय अधिकारी व बांधकाम अधिकाऱ्यांना वारंवार भेटून त्या ठिकाणी दिव्यांगासाठी मार्गदर्शन करणारी फरशी लावण्यासाठी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला अखेर नोव्हेंबर 2024 रोजी यश आले व कामाला सुरुवात झाली आहे.
रुग्णालयामध्ये दिव्यांग सर्टिफिकेट बनवण्यासाठी दर गुरुवारी त्या ठिकाणी दिव्यांग येत असतो व उपचार घेण्यासाठी ही त्या ठिकाणी दिव्यांग येत असतात तर त्याकडे कोणाचेही लक्ष नसते मला दीड वर्षांपूर्वी त्या ठिकाणी लक्षात आले व त्यासाठी मी पाठपुरावा सुरू केला त्या ठिकाणी पाय घसरून इजा व जीवीतहानी होण्याची दाट शक्यता होती 2019 रोजी हॉस्पिटल चे काम सुरू झाले होते पण त्यावेळी कोणाच्याही ते लक्षात आले नाही की दिव्यांग मार्गदर्शन करणारी फारशी लावायची आहे. महानगरपालिकांनी त्यांच्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल वगैरे ऑफीस असेल त्या ठिकाणी जर दिव्यांगांना मार्गदर्शन करणारे फरशी लावलेले नसेल तर कृपया महानगरपालिका आयुक्तांनी सर्व ठिकाणी व्हिजिट देऊन चेक करावे अशी मागणी दीपक सरोदे यांनी केली आहे अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये दिव्यांगाना घेऊन मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात येत आहे..

