विवेक बा. मिरालवर अहेरी तालुका प्रतिनिधी – अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम छल्लेवाडा येथील एका तीन दिवसीय नवजात चिमुकलीचा रुग्णवाहिकेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २० डिसेंबर रोजी घडली. दरम्यान, या घटनेने दक्षिण गडचिरोलीतील आरोग्यसेवेचे वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
श्रीराणी नवीन ताटपल्ली या महिलेने १८ डिसेंबर रोजी छल्लेवाडा येथील आरोग्य केंद्रात सकाळी १०:२५ वाजता नॉर्मल प्रसूतीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची प्रकृती स्थिर होती. त्याच दिवशी श्रीराणी यांना आरोग्य केंद्रातून सुट्टी देण्यात आली. २० डिसेंबर रोजी आशासेविकेने गृहभेट दिली व पोलिओ डोस देण्यासाठी आरोग्य केंद्रात बोलावले. मात्र, तेथे डोस दिल्यानंतर चिमुकली रडायला लागली. यानंतर तिची प्रकृती
बाळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आले आणि तपासले असता ते मृत होते. वाटेतच बाळाचा मृत्यू झाला असावा. बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही. हायपोथर्मिया, थंडी, दूध न मिळणे किंवा दूध पाजताना काळजी न घेतल्यास दूध फुफ्फुसात जाऊन श्वास गुदमरणे, अशा विविध कारणांनी बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
– डॉ. आर. एल. हकीम, बालरोग तज्ज्ञ, अहेरी उपजिल्हा रुग्णालय
खालावत गेली. रुग्णवाहिका बोलावून तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वाटेत तिची प्रकृती आणखीच खालावली. मात्र चिमुकलीला लावण्यासाठी रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नव्हती. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता, चिमुकली मृत पावल्याचे घोषित केले. नवजात मुलीच्या मृत्यूने नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

