prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काजवा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काजवा

0
110

आजही सांज विरली
जणू कालचीच जशी,
ओंजळभर काजवे
अजूनी स्वप्न उराशी,

दिशादीशातून ऊरला
रातराणीचा सुगंध
भरूनी काजवे वरी
भासती मज स्वच्छंद

चमचमती काजवे
काळोख्या माळरानात,
आशेची नवी चमक
आपल्या अंतर्मनात.

मंद मंद आकर्षक
सजावट जेव्हा दिसें,
लुकलुकणारा तारा
काजवा मजला भासे,

नक्षत्रांचे तारांगण
फेर धरुनी अंगणी,
जणू काजव्यांचे थवे
लुकलूकती मन्मनी,

संदेश घेऊनि जणू
काजवा जवळ आला
स्वयंप्रकाश होऊनि
आदर्श घेऊन चला.

कवयित्री सौं. पल्लवी संजय आल्हाट
अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here