सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सिरोंचा दि. 23 डिसेंबर 2024 रोजी मा.आ.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी शिक्षण विभाग, पंचायत समिती सिरोंचा जिल्हा गडचिरोली तर्फे मॉडेल हायस्कूल, सिरोंचा येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय, सिरोंचा निलेश होनमोरेजी,विशेष अतिथी श्रीकृष्ण पेंदाम, गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा, चेतन पेदापल्ली, पशुधन विकास अधिकारी सिरोंचा,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा राका चे जेष्ठ नेते बबलू हकीमजी, सिरोंचा राका तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, वेंकटलक्ष्मी अरवेली, तसेच सिरोंचा तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपस्थित होते.

