प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे – पुणे – रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेचे चौक येथे सदाशिव पेठ शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन तर केळकर रस्त्यावरील माती गणपती जवळ नारायण पेट शाखेचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, के. सी. पवार, कार्याध्यक्ष राजेश अडसूळ, रेखा वाघमारे, प्रभा अवलेलू, नूतन शिवरकर, चित्रा साळवे, दिलीप ओव्हाळ, उद्योजक केदार मानकर, शारदा लडकत, कावेरी रासकर, सिद्धार्थ साठे, शाखाध्यक्ष मंदा साठे, अमृता जाधव, मल्हार कदम, रेश्मा जांभळे, राहुल उभे आदी उपस्थित होते.
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान सुरु केले असून कॅन्सरच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये यांनी दिली.
अधिक माहितीसाठी – 8956185702

