बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर – दि.(24) रोजी लोहारा ता.उदगीर येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीला नाबार्डचे सु.श्री.रश्मी वराद,मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय,नाबार्ड पुणे,प्रदिप पराते महाव्यवस्थापक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय,पुणे व प्रमोद पाटील जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड लातूर.यांची कंपनीला भेट दिली.भेटी दरम्यान अधिकारी यांनी गांडुळ खत निर्मिती केंद्रास भेट देवून गांडुळ खत कसे तयार करतात याबाबत माहिती जाणून घेतले.
यामध्ये गांडूळ खताची निर्मिती कशाप्रकारे केली जाते याविषयीची माहिती कंपनी संचालक यांच्याकडून जाणून घेतली तसेच कंपनी ने उत्पादीत केलेल्या सेंद्रीय कृषी निविष्ठा यांची महिती जाणून घेतली यामध्ये निम अर्क,दशपर्णी अर्क व गांडूळ पाणी कशा प्रकारे कंपनी तयार करीत याबाबतची माहिती कंपनी संचालक यांच्याकडून जाणून घेतली.तसेच कंपनी कार्यालयास भेट देवून कृषी सेवा केंद्राचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते फित कापून उद्घटन करण्यात आले.यांनतर अधिकारी यांनी कंपनी स्थापन झाल्यापासून ते आता पर्यंत कंपनीने केलेल्या विकास कामाची माहिती जाणून घेतली यामध्ये कंपनीची स्थापना का करावीशी वाटली,सभसद जोडणी, सभासद भागधारक यांना कंपनीकडून काही प्रमाणत मदत होते का? सोयाबीन,तुर,हरभरा खरेदी विक्री यामधून कंपनीचा अनुभव तसेच कंपनी सीएससी सेंटरच्या माध्यमातून कंपनीला फायदा होतो का,यापुढे कंपनीने कोणता व्यवसाय करणार आहे,व्यवसाय उभारणी करण्यासाठी आर्थिक तरतूद कशी करणार,नाबार्डचे पुढील काळात गरज आहे का इत्यादी विषयावर कंपनी संचालक मंडळ याच्या सोबत चर्चा करण्यात आली तसेच अधिकारी यांनी वरील विचारलेल्या प्रश्नांची माहिती दिली.तसेच व्यवसाय उभारणीसाठी अफार्म संस्थेच्या वतीने कंपनीला आर्थिक मदत मिळाली आहे अशी माहिती कंपनी संचालक यांच्याकडून देण्यात आली.भेटीच्या वेळी अफार्म संस्थेचे विभागीय संचालक,राजेंद्र इंगळे,यशवंत गायकवाड, कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले,संचालक पद्माकर मोगले,आनंद कांबळे,सीमा साखरे, कंपनी सीईओ आकाश शिंदे,लेखापाल ऋषिकेश मोमले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

