यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रुग्ण सेवा समितीचे तीन महिन्यांपूर्वी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. परंतु ज्या मागण्यांना धरून अन्नत्याग आंदोलन केले होते त्या मागण्या लिखित स्वरूपात माननीय अधिष्ठाता आणि माननीय वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु तीन महिने लोटू नाही अजून पर्यंत त्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून स्मरण अन्नत्याग आंदोलन दिनांक 24/ 12/ 24 ला सुरू करण्यात आले आहे.
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची लेख – येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव
आज तीन दिवस लोटू न ही शासन आणि प्रशासन याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. आंदोलन करणाऱ्याची दिवसान दिवस तब्येत घसरत चालली आहे तरी याची दखल त्वरित घेण्यात यावी अन्यथा पुढील जबाबदारी मा. अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक हे सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
आंदोलन कर्ते संगपाल बारसे, प्रवीण आडे, समिती मेंबर, मनीषा तीरनकर, उषा श्रीराम मोबीन शेख यांची उपस्थित होते.

